दोन विवाह न केल्यास जन्मठेप
By admin | Published: March 25, 2017 12:19 AM2017-03-25T00:19:39+5:302017-03-25T00:19:39+5:30
इरिट्रिया या आफ्रिकी देशात प्रत्येक पुरुषाला दोन महिलांशी विवाह करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अस्मारा : इरिट्रिया या आफ्रिकी देशात प्रत्येक पुरुषाला दोन महिलांशी विवाह करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास तुरुंगात जावे लागू शकते. इरिट्रियात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे तेथील सरकारने पुरुषांना दोन महिलांशी विवाह करण्याचा आदेश दिला असून, तसा कायदाच केला आहे. पुरुषाने दुसरा विवाह न केल्यास त्याला तसेच पहिल्या पत्नीने दुसऱ्या विवाहात अडचण आणल्यास तिलाही जन्मठेप होऊ शकते. या कायद्यामुळे इरिट्रियात दोन विवाह करणाऱ्या पुरुषांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तथापि, जगभरातून यावर तीव्र टीका होऊ लागली आहे.
यादवीत मोठ्या प्रमाणात पुरुष मारले गेल्यामुळे या देशात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. १९९८ ते २००० दरम्यान इथियोपियातून वेगळे होण्याच्या युद्धात इरिट्रियातील १,५०,००० लोक मृत्युमुखी पडले होते. तेव्हा इरिट्रियाची लोकसंख्या होती ४० लाख.