...तर अमेरिकेबरोबर युद्ध अटळ - रशिया
By admin | Published: April 8, 2017 01:11 PM2017-04-08T13:11:42+5:302017-04-08T13:27:10+5:30
सीरियन हवाई दलाच्या तळावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे अमेरिका-रशिया संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 8 - सीरियन हवाई दलाच्या तळावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे अमेरिका-रशिया संबंधात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेला त्यांच्या या कृतीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाने दिला आहे. सीरियातील बशर असाद सरकारने आपल्याच नागरिकांवर रासायनिक हल्ला केल्यानंतर अमेरिकेने सीरियाच्या शायरत तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केले.
असाद सरकारवर जरब बसवणे हा या कारवाईमागे अमेरिकेचा हेतू होता. भूमध्य सागरातील यूएसएस पोर्टर आणि यूएसएस रॉस या दोन युद्धनौकांवरुन अमेरिकेने 50 पेक्षा जास्त टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली. जानेवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी परराष्ट्र विषयक घेतलेला हा मोठा निर्णय होता. अमेरिकेने ही कारवाई करुन सहावर्षांपासून सीरियात सुरु असलेल्या गृहयुद्धात पहिल्यांदाच थेट हस्तक्षेप होता.
याआधीचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी असा थेट हस्तक्षेप टाळला होता. अमेरिकेने केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. यामुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात येईल असे रशियाने शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले. अमेरिका रशियन लष्कराबरोबर संघर्ष करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे असा इशारा रशियाचे पंतप्रधान दिमित्री मिदवेदेव यांनी दिला आहे. सीरियाला रशिया आणि इराण या दोन देशांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे येणा-या दिवसात हा संघर्ष अधिक चिघळणार आहे.