लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:47 IST2024-12-10T14:44:58+5:302024-12-10T14:47:17+5:30
१० डिसेंबरपासून एअर इंडियाने ट्रॅव्हल अडव्हायसरी म्हणजे प्रवासासंबंधीची नियमावली जारी केली आहे

लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा
Air india travel Advisory, London Heathrow airport: तुम्ही जर नजीकच्या काळात लंडनला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. एअर इंडियाने आज म्हणजेच १० डिसेंबर रोजी एक ट्रॅव्हल अडव्हायसरी म्हणजे प्रवासासंबंधीची नियमावली जारी केली आहे. यात प्रवाशांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. एअरलाइनच्या या घोषणेमुळे तुमचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. एअर इंडियानेलंडन हिथ्रो विमानतळावरून भारतात जाण्यासाठी चेक-इनची वेळ वाढवली आहे. आता प्रवाशांना अधिकची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांसाठी या विमानतळावरून चेक इनची वेळ ६० मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
एअर इंडिया काय म्हणाली?
एअर इंडियाने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून ही माहिती दिली. पोस्टमध्ये, एअर इंडियाने म्हटले आहे की, लंडन हिथ्रो विमानतळावरून भारताकडे प्रस्थान करण्यासाठी, चेक-इन काउंटर आता तुमच्या निर्धारित वेळेच्या ७५ मिनिटे आधी सुरु होतील. ही वेळ आधी ६० मिनिटे होती. पण प्रवाशांच्या सोयीसाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.
Important #TravelAdvisory
— Air India (@airindia) December 10, 2024
For all departures from London Heathrow to India, the check-in counter will now close 75 minutes prior to your scheduled departure time. This adjustment from the previous 60-minute closure ensures a seamless and comfortable travel experience for all,…
बदल का करण्यात आला?
एअर इंडियाने सांगितले की, प्रवाशांना प्रवासात आराम वाटावा यासाठी त्यांनी चेक इनची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांनी वाढवून ७५ मिनिटे करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यस्त वेळापत्रकातही आरामात विमान प्रवास व्हावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे असे केले गेले आहे जेणेकरून गर्दीच्या वेळेतही चेक-इन प्रक्रिया आणि सुरक्षा मंजुरीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
यापूर्वी एअर इंडियाने भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी चेक-इनची वेळ ६० मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढवली होती.