अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी

By admin | Published: June 15, 2016 07:56 AM2016-06-15T07:56:21+5:302016-06-15T07:56:21+5:30

आमचा संदेश स्पष्ट आहे. जर तुम्ही अमेरिका आणि आमच्या साथीदारांना टार्गेट केलंत तर तुम्ही कधीच सुरक्षित राहणार नाहीत अशी धमकी बराक ओबामांनी इसीसला दिली आहे

If you attack America, you will never be safe, Obama threatens ISIS | अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी

Next
>ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. 15 - 'इराक आणि सिरियामधून इसीसचं अस्तित्व कमी होत असून परदेशी हल्लेखोर या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याचं प्रमाणही कमी झाल्याचा', दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. 'इसीस आपली जमीन गमावत आहेत. सोबतच या दहशतवादी संघटनेला जिवंत ठेवण्याचा महत्वाचा वाटा असलेला पैसा मिळणंही बंद झालं असल्याचं', बराक ओबामा बोलले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना बराक ओबामा यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
'आपण त्यांच्या तेलसाठ्यांच्या ठिकाणावर केलेल्या हल्ल्यांमुळे महिन्यामागे त्यांना मिळणारा लाखो डॉलर्सचा महसूल आपण रोखला आहे. पैसे ठेवण्याची त्यांची ठिकाणंही आपण उद्ध्वस्त केली आहेत, ज्यांमुळे त्यांच आर्थिक नुकसान वाढलं असल्याचंही', बराम ओबामा बोलले आहेत.' इसीसला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणारी आर्थिक मदतही मिळणं बंद झाली असल्याचा', दावा बराक ओबामांनी केला आहे. 
 
(अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार)
 
'इसीसकडचा पैसा संपत चालला आहे. पैसा संपत असल्याने संघटनेसाठी काम करणा-यांच्या पगारांमध्येदेखील कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या कैदेत असलेल्यांची सुटका करण्यासाठी जास्तीत जास्त खंडणी मागितली जात आहे. आपल्या काही लोकांनी सोनं आणि पैसे चोरताना पकडल्याची कबुली स्वत: इसीसने दिली आहे. त्यांचं खरं रुप पुन्हा एकदा समोर आलं आहे. हे धर्मासाठी लढत नसून चोर आहेत', असं बराक ओबामा बोलले आहेत. 
 
(ओरलँडो हत्याकांड आम्ही घडविले)
 
'इसीसशी लढा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराची अतिरिक्त तुकडी ज्यामध्ये स्पेशल फोर्सचादेखील समावेश असेल सिरियामधील स्थानिक सैन्याला मदत करेल. अतिरिक्त सल्लागार इराक सुरक्षा यंत्रणेसोबत जास्तीत जास्त काम करतील. जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उत्तर इराकमधील स्थानिक सैन्याला लढाऊ हेलिकॉप्टरपासून ते इतर सर्व मदत पुरवली जाईल', असं आश्वासन बराक ओबामांनी दिलं आहे. 
 
(हवाई हल्ल्यात इसिसचा म्होरक्या अल बगदादी ठार ?)
 
'इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत 120 हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा', दावा बराक ओबामांनी केला आहे. 'आमचा संदेश स्पष्ट आहे. जर तुम्ही अमेरिका आणि आमच्या साथीदारांना टार्गेट केलंत तर तुम्ही कधीच सुरक्षित राहणार नाहीत', अशी धमकीही दिली आहे. 
 

Web Title: If you attack America, you will never be safe, Obama threatens ISIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.