कामावर येत असाल, तर घरी परत जा! या वर्षात अमेरिकन टेक-कंपन्यांनी केली कर्मचारी कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 09:24 AM2022-11-07T09:24:36+5:302022-11-07T09:25:02+5:30
कामावर येण्यासाठी घरातून निघाला असाल, तर घरी परत जा !- असा थेट ई-मेल
कामावर येण्यासाठी घरातून निघाला असाल, तर घरी परत जा !- असा थेट ई-मेल पाठवून ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी कंपनीच्या ७५०० पैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना एका फटक्यात कामावरून काढून टाकलं, ही बातमी सध्या चर्चेचा विषय आहे. ट्विटर इंडियाच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना घरी जावं लागलेलं आहे; पण लेऑफ्स याच नावाच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार मस्क यांनी ज्याप्रकारे कर्मचारी कपात केली ती पद्धत धक्कादायक असली तरी कोरोनाची साथ आल्यापासून टेक्नॉलॉजीच्या जगात कर्मचारी कपातीची ही कुऱ्हाड अनेक कंपन्यांनी अनेकदा उगारलेली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या काळात अमेरिकेतील ४१६ टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.