गेममध्ये मरताच खऱ्या जीवनातही खेळणाऱ्याचा होणार मृत्यू, नव्या VR हेडसेटमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 03:43 PM2022-11-11T15:43:33+5:302022-11-11T15:44:09+5:30

VR Game:व्हर्च्युअल रियालिटी फर्म Oculus Rift च्या संस्थापकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. या दाव्यानुसार त्यांनी एक हेडसेट बनवला आहे, ज्याच्या माध्यमातून जर कुणी गेमर गेम खेळत असताना व्हर्च्युअल जगात मारला गेला तर खऱ्या जीवनातही त्याचा मृत्यू होईल.

If you die in a game, the player will die in real life too, the new VR headset is exciting | गेममध्ये मरताच खऱ्या जीवनातही खेळणाऱ्याचा होणार मृत्यू, नव्या VR हेडसेटमुळे खळबळ

गेममध्ये मरताच खऱ्या जीवनातही खेळणाऱ्याचा होणार मृत्यू, नव्या VR हेडसेटमुळे खळबळ

googlenewsNext

नवी दिल्ली - व्हर्च्युअल रियालिटी फर्म Oculus Rift च्या संस्थापकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. या दाव्यानुसार त्यांनी एक हेडसेट बनवला आहे, ज्याच्या माध्यमातून जर कुणी गेमर गेम खेळत असताना व्हर्च्युअल जगात मारला गेला तर खऱ्या जीवनातही त्याचा मृत्यू होईल. Oculus चे संस्थापक पाल्मेर लकी यांनी सांगितले की, हे यंत्र एक जपानी कादंबरी Sword Art Online वर आधारित आहे. पाल्मेर यांनी आपल्या या हेडसेटला नेव्हर गिअर असं नाव दिलं आहे. पाल्मेर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, हा एक सर्वसामान्य व्हीआरसारखाच असेल, ज्यामध्ये तीन एक्स्प्लोसिव्ह चार्ज असू शकतात. ते या हेडसेट गेमला एकदम खरोखरीचा फिल देतील. 

लकी यांनी २०१७ मध्ये Oculus सोडून Anduril Industries सुरू केली होती.  त्यावेळी त्यांनी ते NerveGear च्या रियल लाईफ व्हर्जनवर काम करत असल्याचे सांगितले होते. तसेच त्यावरील जवळपास अर्धे काम पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले होते. 

Sword Art Online कादंबरीबाबत बोलायचे झाल्याच या गोष्टीमध्ये काही खेळाडू असतात, ते एक ऑनलाइन रोल प्ले गेम खेळतात. जर या गोष्टीतील एखादे पात्र गेमदरम्यान, मृत्युमुखी पडले तर प्रत्यक्ष जीवनातही त्याला प्राण गमवावे लागतात. यामध्ये सर्व प्लेयर्स NerveGear हेडसेट घालतात. कादंबरीनुसार गेम संपल्यानंतर स्क्रीनवर गेम ओव्हर असे शब्द उमटतात. त्यानंतर एक फायर होते आणि युझरच्या मेंदूच्या चिंधड्या उडून त्याचा मृत्यू होतो.

पाल्मेर यांनी सांगितले की, एक परफेक्ट व्हीआर बनवण्यासाठी काही अजून वेळ लागू शकतो. तो अद्याप परफेक्ट झालेला नाही. या हेडसेटमध्ये तीन स्फोटके लावण्यात आली आहेत. ती थेड प्लेयरच्या डोक्यावर लागलेली असतात. गेम संपल्यावर स्क्रिनवर लाल रंग येतो आणि नॅरो बँड फोटोसेंटर एकमेकांशी जोडले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या या हेडसेटचं केवळ एकच व्हर्जन उपलब्ध आहे. त्याशिवाय हा हेडसेट सर्वसामान्य लोकांना विक्रीसाठी उपलब्ध नाही आहे. त्याशिवाय हा हेडसेट भविष्यात उपलब्ध केला जाऊ शकतो.  

Web Title: If you die in a game, the player will die in real life too, the new VR headset is exciting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.