सहा महिन्यात लॅपटॉप वापरायला शिका नाहीतर गच्छंती अटळ- नेपाळच्या पंतप्रधानांचा मंत्र्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 01:57 PM2018-05-31T13:57:45+5:302018-05-31T13:57:45+5:30
पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडून आले आहेत.
काठमांडू- नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या मंत्र्यांना सहा महिन्यात लॅपटॅाप शिकण्याचे आदेश दिले आहेत. असे न झाल्यास पदावरून काढून टाकू असा इशारा दिला आहे. नेपाळच्या पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडून आले आहेत.
येत्या सहा महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे सर्व कामकाज संगणकीकृत करण्यात येईल असा मनोदय त्यांनी जाहीर केला आहे.
नेपाळ टिचर्स असोसिएशनच्या 12 व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना त्यांनी हे आदेश मंत्र्यांना दिले आहेत. यावेळेस ते म्हणाले, ज्या मंत्र्यांना लॅपटॉप वापरता येत नाही, त्यांना पदावरुन बाजूला करण्यात येईल. पंतप्रधान कार्यालय पेपरलेस करण्याचा निर्णय मी मंत्रिमंडळाला आधीच सांगितला असून सर्व बैठकीचा अजेंडा व सर्व कार्यक्रमांवर लॅपटॉपवरच चर्चा होईल .
लॅपटॉप वापरणे शिकण्यासाठी मंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची मदत घेऊ शकतात. पण सहा महिन्यात ते लॅपटॉप वापरणे शिकले नाही तर त्यांना मंत्रिपदावरुन दूर केले जाईल. ओली यांच्या सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास करण्याचे धोरण अवलंबले आहे.