दाढी केली तर इसिसचा आता शंभर डॉलर दंड
By admin | Published: May 31, 2016 05:55 AM2016-05-31T05:55:15+5:302016-05-31T05:55:15+5:30
आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या इसिसने नव्याने काही कर लावले आहेत. आता दाढी केल्यास शंभर डॉलर, तर जास्त घट्ट कपडे वापरल्यास २५ डॉलरचा दंड ठोठावण्यात येणार आहे
वॉशिंग्टन : आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या इसिसने नव्याने काही कर लावले आहेत. आता दाढी केल्यास शंभर डॉलर, तर जास्त घट्ट कपडे वापरल्यास २५ डॉलरचा दंड ठोठावण्यात येणार आहे. इसिसने नव्याने हे कर आणि दंड लागू केले आहेत. सिगारेटचे पाकीट आढळल्यास पुरुषांना ४६ डॉलरचा दंड भरावा लागेल.
एका पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. इसिसची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रात इसिसने हे नवे कर लावले आहेत. वरिष्ठ विश्लेषक लुडोविको कार्लिनो यांनी सांगितले की, गत सहा महिन्यांपासून इसिसने नवे कर सुरू केले आहेत. या माध्यमातून अधिक निधी जमा करण्याचा मानस आहे.
दाढी केल्यास शंभर डॉलर, कमी दाढी केल्यास ५० डॉलर, पारंपरिक वस्त्र परिधान न केल्यास पुरुषांना पाच डॉलर, तर जास्त घट्ट कपडे वापरल्यास महिलांना २५ डॉलरचा दंड द्यावा लागणार आहे.