सोशल मीडियावर केली अशी चूक तर अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, ट्रम्प यांचा नवा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:42 IST2025-04-15T10:42:21+5:302025-04-15T10:42:40+5:30

US Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या अनेक धोरणांमध्ये मोठे बदल होत आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तसेच नोकरी करू इच्छिणाऱ्यांवर होत आहे.

If you make such a mistake on social media, you will not be allowed to enter the US, Trump's new order | सोशल मीडियावर केली अशी चूक तर अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, ट्रम्प यांचा नवा आदेश 

सोशल मीडियावर केली अशी चूक तर अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, ट्रम्प यांचा नवा आदेश 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या अनेक धोरणांमध्ये मोठे बदल होत आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तसेच नोकरी करू इच्छिणाऱ्यांवर होत आहे. अमेरिकेचं इमिग्रेशन धोरण आता अधिकच कठोर झालं असून, त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्यांवर नेहमी निर्वासनाची टांगती तलवार राहणार आहे.

यामधील एक नियम आता समोर आला आहे. या नियमानुसार आता सोशल मीडियावरील पोस्ट, प्रतिक्रिया यांचाही व्हीसा आणि एमिग्रेशनबाबत निर्णय घेताना विचार केला जाणार आहे.  जर एखाद्या व्यक्तीने मग तो विद्यार्थी असो वा नोकरीच्या निमित्ताने आलेला तरुण असो वा नागरिकत्वासाठी अर्ज करणारा असो, त्याने ज्यूविरोधी विचार व्यक्त केले, किंवा एखाद्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिला, तर त्यांचा अमेरिकेमधील प्रवेश रोखला जाईल.

अमेरिकेच्या यूएससीआयएसने दिलेल्या माहितीनुसार जर कुठलीही व्यक्ती सोशल मीडियावर ज्यूविरोधी विचार, इस्राइलविरोधात द्वेष किंवा किंवा अशा कुठल्या पोस्ट पोस्ट करत असेल, तर त्यांना कुठल्याही सूचनेविना कारवाईचा सामना करावा लागेल, त्याशिवाय जर कुणी हमास, हुतीसारख्या दहशतवादी संघटनांना समर्थन देत असेल, त्यांच्या कारवायांना योग्य ठरवत असेल, तर त्यांनाही देशातून हाकलून देण्याची व्यवस्था केली जाईल. 

हा नवा नियम आता लागू करण्यात आला आहे. तसेच हा नियम विद्यार्थी व्हिसापासून ग्रीन कार्डपर्यंतच्या इमिग्रेशनच्या प्रक्रियांवर प्रभाव पाडणार आहे. 

Web Title: If you make such a mistake on social media, you will not be allowed to enter the US, Trump's new order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.