स्वर्गात जायचे असेल तर आत्मघातकी बॉम्ब हो...

By admin | Published: December 27, 2014 12:04 AM2014-12-27T00:04:25+5:302014-12-27T00:04:25+5:30

नायजेरियात एका १३ वर्षांच्या मुलीला स्फोटके बांधलेल्या अवस्थेत पकडण्यात आले असून, बोको हरामने आपल्याला स्फोट करण्यासाठी पाठवले असा तिचा दावा आहे.

If you want to go to heaven, be a suicide bomber ... | स्वर्गात जायचे असेल तर आत्मघातकी बॉम्ब हो...

स्वर्गात जायचे असेल तर आत्मघातकी बॉम्ब हो...

Next

कानो, नायजेरिया - नायजेरियात एका १३ वर्षांच्या मुलीला स्फोटके बांधलेल्या अवस्थेत पकडण्यात आले असून, बोको हरामने आपल्याला स्फोट करण्यासाठी पाठवले असा तिचा दावा आहे. जोहरा बाबनगिडा असे तिचे नाव असून, तिच्या बापानेच तिला बोको हरामच्या ताब्यात दिले होते, असे तिने सांगितले.
नायजेरियात लहान मुली व महिलांनी अनेक आत्मघातकी हल्ले केले असून, मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला आहे. त्यावरून दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यासाठी अपहरण केलेल्या मुलींचा वापर करत असल्याचे लक्षात आले आहे. बुधवारी स्फोटकांचा स्फोट करण्यास नकार देणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलीला कानो येथे अटक करण्यात आली. रात्री तिने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार बोको हरामच्या शिबिरात तिच्या वडिलांनीच तिला नेले होते. तिथे अनेक लोकांना जिवंत पुरताना पाहिल्याचे जोहराने सांगितले.
त्यानंतर जोहराची पाळी आली तेव्हा तिला स्वर्गात जायचे आहे काय? असे विचारण्यात आले, स्वर्गात जायचे असेल तर तुला आत्मघातकी बॉम्ब बनावे लागेल, मृत्यूनंतर तू स्वर्गात जाशील असे जिहादी सदस्यांनी तिला सांगितले. तिने मरण्यास नकार दिला, तेव्हा तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. मला जिवंत पुरले जाण्याची भीती वाटली, म्हणून मी स्फोटके बांधून घेतली असे या मुलीने सांगितले. नायजेरियात इस्लामी स्टेट निर्माण करण्यासाठी बोको हरामचा संघर्ष चालू आहे. दोन मुलींनी गेल्या आठवड्यात कानोच्या बाजारात स्वत:चा स्फोट घडवून आणला होता. त्यात या मुलींसह चारजण ठार झाले होते व सात जखमी झाले होते. एप्रिल महिन्यात बोको हरामने चिबॉक शहरातील निवासी शाळेतून २७६ मुलींचे अपहरण केले होते. त्यातील काही मुली निसटल्या; पण २१९ मुली अजूनही बेपत्ता आहेत. या मुलींचे धर्मांतर केले असून, त्यांचे विवाह बोको हरामच्या सदस्यांशी लावण्यात आल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: If you want to go to heaven, be a suicide bomber ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.