आरोग्य टिकवायचे असेल तर जंगलस्नान करीत जा
By admin | Published: June 6, 2017 04:55 AM2017-06-06T04:55:51+5:302017-06-06T04:55:51+5:30
फॉरेस्ट बाथिंग म्हणजेच जंगलस्नान. हा शब्द तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकला असेल
फॉरेस्ट बाथिंग म्हणजेच जंगलस्नान. हा शब्द तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकला असेल; परंतु व्यायाम न करता, औषधी न घेता फिट आणि फाईन राहण्यासाठी जपानी लोक या जंगलस्नानाचा उपाय अनेक दशकांपासून करीत आहेत. हे जंगलस्नान म्हणजे आहे तरी काय? याद्वारे तुम्ही कसे आनंदी आयुष्य जगू शकता? जगात पहिल्यांदा जपानी वैज्ञानिकांनी फॉरेस्ट बाथिंगची संकल्पना मांडली. उत्तम आरोग्यासाठी खूप फायद्याचे हे जंगलस्नान म्हणजे झाडांच्या सहवासात आरामदायक आणि शांतपणे पायी चालणे होय. जपानमध्ये आरोग्यासाठी १९८२ मध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्रॅम राबविण्यात आला होता. त्याचे नाव होते ‘शिनरिन योकू’ याचा जपानी भाषेत अर्थ होतो झाडांच्या आजूबाजूला जास्त वेळ घालवणे. त्यामुळेच जपानमध्ये जंगलस्नान जास्त लोकप्रिय आहे.