IIFA Awards 2018 : तब्बल 20 वर्षांनंतर रेखा यांनी दिला जबरदस्त परफॉर्मन्स, चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 10:39 AM2018-06-25T10:39:29+5:302018-06-25T11:11:12+5:30
बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा 'रेखा' यांच्या अदा आजही तितक्याच मनमोहक आणि घायाळ करणाऱ्या आहेत.
बँकॉग - बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा 'रेखा' यांच्या अदा आजही तितक्याच मनमोहक आणि घायाळ करणाऱ्या आहेत. IIFA अवॉर्ड्स सोहळ्याच्या निमित्तानं 63व्या वर्षातही रेखाच्या सौंदर्याची मोहिनी आजही कायम असल्याचे पाहायला मिळालं. रविवारी (24 जून) बँकॉकमध्ये झालेल्या IIFA अवॉर्ड्स सोहळ्यात रेखा यांनी मनमोहक नृत्य सादर करत सर्वांची हृदयं जिंकली. तब्बल 20 वर्षांनंतर मोठ्या मंचावर त्यांनी पुनरागमन केले आहे. 'सलाम-ए-इश्क मेरी जा जरा कबूल कर लो', 'थारे रहियो ओ बांके यार', आणि 'प्यार किया तो डरना क्या' या सदाबहार गाण्यांवर त्यांनी दमदार नृत्य सादरीकरण केले.
त्यांच्या दिलखेचक नृत्यानं सर्वजण घायाळ झाले. त्यांच्या प्रत्येक हरकतींवर प्रेक्षक टाळ्यांचा वर्षाव करत होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करत मनमोहक नृत्य सादर करणाऱ्या रेखा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. रेखा यांनी गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. यामध्ये त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. आजही सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये रेखा यांची क्रेझ कायम असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. IIFA 2018 मध्ये रेखा यांच्या परफॉर्मन्सनं वेगळीच रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणामुळे जुन्या आठवणी पुन्हा नव्यानं जिवंत झाल्या.
#WATCH: Actress Rekha's dance performance on stage after a gap of 20 years at IIFA awards 2018 in Thailand's Bangkok.
— ANI (@ANI) June 24, 2018
Video courtesy: IIFA pic.twitter.com/BRpqFS4czs