अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:17 AM2021-05-11T10:17:20+5:302021-05-11T10:18:24+5:30

भारतात एका डोजसाठी खूप वाट बघावी लागत आहे. तेच इटलीमधील एका डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे एकाच मुलीला ६ वॅक्सीन डोज दिले गेले आहेत.

IItalian nurse vaccinated 23 year old student with-6 pfizer covid 19 shots mistakenly | अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....

अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....

googlenewsNext

भारतासहीत जगातील अनेक देशांनी कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी वॅक्सीनेशनची प्रक्रिया वाढवली आहे. भारतात नुकतीच १८ वर्षावरील लोकांना वॅक्सीन देण्याची सुविधा सुरू झाली आहे. याआधी ४५ वयावरील लोकांना वॅक्सीन दिली जात होती. भारतात वॅक्सीनेशनसाठी लोकांना स्लॉट बुक करण्यात अनेक अडचणी येत आहेत.  एका डोजसाठी खूप वाट बघावी लागत आहे. तेच इटलीमधील एका डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे एकाच मुलीला ६ वॅक्सीन डोज दिले गेले आहेत.

ही घटना ९ मे ची सांगितली जात आहे. इटलीमध्ये २३ वर्षीय एका विद्यार्थीनीला Nao हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी ६ वेळा कोरोना वॅक्सीन दिली गेली. वॅक्सीनेशनमध्ये झालेल्या या घोडचुकीची चर्चा जगभरात होत आहे. न्यूज एजन्सी AGI च्या रिपोर्टनुसार, ६ डोजनंतर हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वच चिंतेत होते की, इतके डोज दिल्यानंतर मुलीच्या शरीरावर त्याचा प्रभाव होईल. त्यामुळे मुलीला २४ तास मेडिकल ऑब्जर्वेशनमध्ये ठेवलं गेलं. (हे पण वाचा : Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय)

कोणतेही साइड इफेक्ट नाही

Nao हॉस्पिटलचे डायरेक्टर Dr Antonella Vicenti या घटनेची माहिती देताना सांगितले की, मुलीवर कोणतेही साइड  इफेक्ट नाहीत. तिला २४ तास ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. Pfizer चे इतके डोज दिल्यावर सर्वांनाच भीती होती की, आता याचे काय परिणाम होणार? मात्र, मुलीला ना ताप आला ना वेदना झाल्या. पण मुलगी सहा डोजनंतर घाबरलेली होती. (हे पण वाचा : चीनने जैविक युद्ध लढण्याचा केला होता विचार, अमेरिकेच्या विदेश विभागाने केला दावा )

६ डोजनंतर २४ तासांपर्यंत मुलीला ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं. यानंतर जेव्हा काही साइड इफेक्ट दिसले नाही तर तिला डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर म्हणाले की, आता या मुलीला सतत मेडिकल ऑब्जर्वेशनसाठी बोलवलं जाईल. हे चेक केलं जाईल की, इतक्या डोजचा तिच्या शरीरावर काही वाईट परिणाम होतोय की नाही. याआधी रिसर्चमधून समोर आलं होतं की, Pfizer चे ४ डोज व्यक्ती सहन करू शकतो. आता मुलीला ६ डोज मिळाल्याने सर्व चिंतेत आहेत.
 

Web Title: IItalian nurse vaccinated 23 year old student with-6 pfizer covid 19 shots mistakenly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.