'ते' परत आल्याने मला आनंद झाला, ट्रम्प यांच्याकडून किम जोंग यांचे फोटो शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 12:00 PM2020-05-03T12:00:39+5:302020-05-03T12:01:17+5:30
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली होती. यामुळे चीनने किमला वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीमच कोरियाला पाठविली होती. जवळपास १५ दिवसांपासून किम गायब होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते. मात्र, या सर्व बातम्या अफवा ठरल्या आहेत. कारण, किम जोंग जिवंत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. विशेष म्हणजे त्यांच्या परत येण्याने आपल्याला खूप आनंद झाल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरानाविरुद्ध उपायावर चर्चा केली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्या आजोबांचीच जयंती होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे किम जोंग उन हे अत्यवस्थ असल्याची चर्चा होऊ लागली होती. प्रकृतीच्या कारणामुळे किम यांना नेतेपद सोडावे लागले, तरी उत्तर कोरियात फारशी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही.
I, for one, am glad to see he is back, and well! https://t.co/mIWVeRMnOJ
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 2, 2020
उत्तर कोरीयाई नेते प्योंगयांग यांच्या उत्तरेकडील सनुचोन येथे शुक्रवारी एका फॅक्टरीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी किम जोंग सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. उत्तर कोरियाच्या सरकारी टेलिव्हीजन चॅनले त्यांना चालताना, हसताना आणि सिगारेट पिताना टीव्हीवर दाखवले. ११ एप्रिलनंतर प्रथमचे ते टेलिव्हीजनवर दिसून आले. त्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोंग यांच्या आगमनाचे स्वागत केले आहे. मला हे पाहून आनंद झाला की, ते परत आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
दरम्यान, २०११ मध्ये किम जोंग इल यांचा मृत्यू १७ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आल्याने झाला होता. तेव्हा टीव्ही अँकर री चून यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी काळे कपडे घातले होते. उद्या कोरियाच्या लोकांच्या नजरा चून यांच्याकडेच लागलेल्या असणार आहेत. किम जोंग इल यांच्यावर नऊ दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळीही असेच झाले तर किम जोंग उन यांच्यावर ५ मे रोजी अंत्यसंस्कार केले जातील.