इमान आता आनंदी आहे -शैमा सेलीम

By admin | Published: May 7, 2017 01:02 AM2017-05-07T01:02:23+5:302017-05-07T01:02:23+5:30

मुंबईच्या सैफी हॉस्पिटलने सुटी दिल्यानंतर इजिप्तची इमान अहमद एल आती हिला अबुधाबीतील बुर्जिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Iman is happy now- sharma salim | इमान आता आनंदी आहे -शैमा सेलीम

इमान आता आनंदी आहे -शैमा सेलीम

Next

नवी दिल्ली : मुंबईच्या सैफी हॉस्पिटलने सुटी दिल्यानंतर इजिप्तची इमान अहमद एल आती हिला अबुधाबीतील बुर्जिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दीर्घ काळानंतर इमान आता आनंदी दिसत आहे, असे इमानची बहीण शैमा सेलीम हिने सांगितले.
व्हीपीएस हेल्थकेअरच्या मालकीच्या बुर्जिल हॉस्पिटलमधील २0 विशेषज्ञांचे पथक इमानवर उपचार करीत आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शैमा सेलीम हिने सांगितले की, दीर्घकाळानंतर इमान आता आनंदी दिसत आहे. असंख्य लोकांच्या नजरा आमच्यावर होत्या. त्यामुळे आम्ही दोघीही अस्वस्थ होतो. काल सैफी हॉस्पिटलमधून विमानतळाकडे जायला निघालो तेव्हा रस्त्यात आम्हा दोघींनाही रडू कोसळले. प्रचंड आवाज करणाऱ्या कॉर्गो विमानातही इमान गाढ झोपी गेली.
मुंबई सैफी रुग्णालयात आणण्यापूर्वी इमानचे वजन ४९८ किलो होते. सैफी रुग्णालयात तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिचे वजन १७0 किलो झाले. तथापि, सैफी हॉस्पिटल आणि शैमा यांच्यात मतभेद झाल्यामुळे इमानला अबुधाबीला हलवावे लागले.


सैफी हॉस्पिटल आणि शैमा सेलीम यांच्यातील मतभेद संघर्षाच्या पातळीवर गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप केला होता. शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, विदेशी रुग्ण जेव्हा जेव्हा भारतात उपचारासाठी येतील, तेव्हा तेव्हा दोन्ही देशांच्या दूतावासांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला हव्यात. त्यामुळे भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाहीत.
 इमानच्या प्रकरणात फारच वाद-विवाद झाले. यात स्वत: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना हस्तक्षेप करावा लागला. आमच्या रुग्णालयांना जगभरातून रुग्ण मिळत असतात. अशा घटनांनी आमच्या डॉक्टरांची प्रतिमा मलिन होते.

Web Title: Iman is happy now- sharma salim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.