स्थलांतरितांचा आॅस्ट्रियामध्ये प्रवेश
By Admin | Published: September 1, 2015 11:29 PM2015-09-01T23:29:59+5:302015-09-01T23:29:59+5:30
हंगेरीमधून जर्मनीला जाणाऱ्या स्थलांतरितांनी रेल्वेचा वापर करुन आॅस्ट्रियामध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये ३,६५०
ब्युडापेस्ट : हंगेरीमधून जर्मनीला जाणाऱ्या स्थलांतरितांनी रेल्वेचा वापर करुन आॅस्ट्रियामध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये ३,६५० लोक येऊन पोहोचल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिलेली
आहे. आता हे लोक जर्मनीमध्ये म्युनिखच्या दिशेने जाण्याच्या तयारीमध्ये आहेत.
मात्र त्यानंतर हंगेरीने कठोर धोरण अवलंबत राजधानी ब्युडापेस्टमधील केलेटी रेल्वे स्थानकावर स्थलांतरितांना रोखून धरले. त्यामुळे या स्थानकावर तणावाची स्थिती निर्माण झाली. हंगेरीच्या या भूमिकेवर युरोपातील विविध देशांनी नापसंतीही व्यक्त केली आहे. सर्बिया आणि हंगेरीच्यामध्ये असणाऱ्या सीमेवरती हंगेरीने तारेचे कुंपण आयत्यावेळेस घालण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आधीच्या कुंपणाची दुरुस्तीही करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थलांतरितांच्या लोढ्यांनी त्याला न जुमानता हंगेरीमध्ये प्रवेश केला आहे. आता यापुढे युरोपियन युनियन आणि हंगेरी या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
मर्केल यांची भूमिका : ग्रीस प्रश्नापासून जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी आपल्या ठाम भूमिकेचा प्रत्यय प्रश्नाच्यावेळेस दिलेला आहे. ग्रीसच्या कर्जापेक्षा स्थलांतरितांचा येणारा ताण सर्वात जास्त त्रासदायक ठरणार आहे असे भाकित मर्केल यांनी यापुर्वीच वतर्विले होते. याप्रश्नावर बोलताना त्यांनी काल सांगितले, आता संपुर्ण युरोपने एक होऊन या प्रश्नाला सामोरे गेले पाहिजे. सर्व निर्वासितांचे वितरण योग्य प्रकारे सर्व देशांमध्ये झाले पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. या वर्षभरामध्ये युरोपियन युनियनमध्ये अडीच लाख लोक आश्रयासाठी आलेले आहेत.
सध्या बाल्कन देशांवर या स्थलांतरितांचा ताण आला असला तरी या नागरिकांचे मुख्य ध्येय जर्मनीला पोहोचण्याचेच आहे. जर्मनीमध्ये एकदा पोहोचल्यावर आपला रोजगाराचा व सुरक्षित जीवनाचा प्रश्न सुटेल असे त्यांना वाटते. जर्मनी देखिल गेल्या काही वर्षांमध्ये युरोपचे आर्थिक नेतृत्व करणारा देश झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वाधीक संधी जर्मनीमध्ये उपलब्ध असल्यामुळे तेथे जाण्याची इच्छा या नागरिकांच्या मनामध्ये आहे. या वर्षभरामध्ये जर्मनीकडे दोन लाख लोकांनी आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली आहे.