राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:02 IST2025-01-16T05:33:48+5:302025-01-16T07:02:40+5:30
Yoon Suk Yeol : देशाच्या इतिहासातील येओल हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी आरोपाखाली चौकशीसाठी अटक झाली आहे.

राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक!
सेऊल : मार्शल लॉचा (आणीबाणी) निर्णय घेण्यावरून घेरण्यात आलेल्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना बुधवारी तब्बल १ हजारहून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. यानंतर देशाच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेने यून यांची सुमारे १० तास चौकशी केली.
न्यायालयात हजर न झाल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना घटनास्थळी नागरिकांचा प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. अटकेसाठी १ हजार हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. या देशात कायद्याचे राज्य पूर्णपणे कोसळले आहे, असे अटकेपूर्वी येओल म्हणाले.
४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली तपास संस्था राष्ट्राध्यक्षांची चौकशी करत आहे. देशाच्या इतिहासातील येओल हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी आरोपाखाली चौकशीसाठी अटक झाली आहे.