हिलेरी क्लिंटन यांच्या प्रकृतीत सुधारणा
By admin | Published: September 16, 2016 01:24 AM2016-09-16T01:24:59+5:302016-09-16T01:24:59+5:30
मोनियातून बऱ्या होत असलेल्या हिलेरी क्लिंटन यांनी आपल्या आरोग्याशी संबंधित नवी माहिती जारी केली आहे. त्यांची प्रकृती आता सुदृढ आहे आणि त्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा देण्यासाठी तयार आहेत
वॉशिंग्टन : न्यूमोनियातून बऱ्या होत असलेल्या हिलेरी क्लिंटन यांनी आपल्या आरोग्याशी संबंधित नवी माहिती जारी केली आहे. त्यांची प्रकृती आता सुदृढ आहे आणि त्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा देण्यासाठी तयार आहेत, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असलेल्या हिलेरी क्लिंटन या रविवारी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत अचानक आजारी पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती जारी करण्यासाठी त्यांच्या प्रचार मोहिमेवर सारखा दबाव आणला जात होता. त्या न्यूमोनियाने पीडित असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते.
माजी परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन यांच्या खासगी डॉक्टर लिसा बर्डाक यांनी हिलेरींच्या आरोग्याविषयीची विस्तृत माहिती गुरुवारी प्रसिद्ध केली. ‘त्या (हिलेरी क्लिंटन) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून सेवा देण्यासाठी अगदी फिट आहेत. (वृत्तसंस्था)
त्यांचे कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड आणि अन्य मुख्य बाबी सामान्य आहेत. तसेच त्यांची मानसिक स्थितीही चांगली आहे. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे,’ असे लिसा यांनी म्हटले आहे.