उद्योगस्नेही धोरणांसाठी सुधारणा

By admin | Published: April 14, 2015 01:18 AM2015-04-14T01:18:00+5:302015-04-14T01:18:00+5:30

उद्योगस्नेही धोरणासाठी आवश्यक असल्यास सुधारणा करण्याची तयारी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन उद्योजकांना भारतात येण्यासाठी साद घातली.

Improvements to industry policies | उद्योगस्नेही धोरणांसाठी सुधारणा

उद्योगस्नेही धोरणांसाठी सुधारणा

Next

हॅनोव्हर : उद्योगस्नेही धोरणासाठी आवश्यक असल्यास सुधारणा करण्याची तयारी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन उद्योजकांना भारतात येण्यासाठी साद घातली. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवायचे असून यासाठूी आमचे कायदे व आमचेच नियम असे धोरण आम्ही ठेवणार नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. हॅनोव्हेर येथील औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी ते सोमवारी येथे बोलत होते.
जर्मनीतील टॉप उद्योगपती व व्यापारी यांच्याशी मोदींनी संवाद साधला. भारतात येताना जुन्या संकल्पना मनात ठेवू नका, भारतात या आणि नवा बदल आपल्या डोळ्यांनी पाहा असे मोदी म्हणाले. मोदी यांनी आपली मेक इन इंडिया ही योजना हॅनोव्हर फेअरमधील इंडो-जर्मन व्यापारी परिषदेचे उद्घाटन करताना मांडली. पंतप्रधान मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या हस्ते इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले.
मी पुन्हा एकदा सांगतो, भारतात या , भारतातील नियमांचे वातावरण बदलले आहे, त्याचा अनुभव घ्या. जुन्या कल्पना मनात ठेवू नका हा माझा सल्ला आहे, असे मोदी म्हणाले. मेक इन इंडिया ही गरज आहे. भारत हे जागतिक उत्पादानचे केंद्र बनवायचे असेल तर फक्त आमचेच नियम व आमचेच कायदे करून चालणार नाही. गरज असेल तिथे आम्ही सुधारणा करू ,असे मोदी यांनी सांगितले.
भारतातील कायदे बदलले आहेत, आता कायदे अधिक पारदर्शी, जबाबदार व स्थिर आहेत. सर्व मुद्यांवर आमचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे. भारतात व्यवसाय करणे आता अधिक सोपे आहे. अर्ज व कायदे अगदी साधे करण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न केले आहेत. विकासासाठी परदेशी भांडवल अत्यंत गरजेचे आहे.
(वृत्तसंस्था)

जर्मनी येथे सुरू असलेल्या उद्योग-व्यापार मेळाव्यात राज्यातील गुंतवणूक संधींचे व्यासपीठ असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या आकर्षक स्टॉलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. महाराष्ट्रात जर्मन उद्योग चांगली कामगिरी करीत असून, आपण महाराष्ट्राला आवर्जून भेट द्यावी, असे निमंत्रण पंतप्रधानांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना या वेळी दिले.

चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध गुंतवणूक समूहांशी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री चर्चा करणार आहेत. या मेळाव्यात जगातील विविध नामांकित उद्योगसमूह व व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींसह संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील विविध खासगी, सरकारी कंपन्या तसेच अनेक भारतीय उद्योगसमूहांनी आपली उत्पादने सादर केली आहेत. भारतीय कंपन्यांनी या मेळाव्यात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे.

अँजेला मर्केल
यांच्यासाठी मँगो लस्सी
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासाठी मँगो लस्सी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजराती पदार्थ खांडवी, ढोकळा आणि खाकरे अशी मेजवानी हॅनोव्हर ट्रेड फेअरमधील इंडिया पॅव्हिलियनमध्ये आयोजित केली होती. हॅनोव्हर फेअरमध्ये ४५ भारतीय शेफ काम करत असून, उपस्थित असणाऱ्या ३ हजार भारतीयांना खास भारतीय पदार्थांची चव चाखवत आहेत. रविवारी रात्री पंतप्रधान मोदी व चॅन्सेलर मर्केल यांनी एकत्र भोजन घेतले. त्यावेळी भारतातील विविध हॉटेलचे मुख्य शेफ विविध पदार्थ सादर करत होते. या मेजवानीस २ हजार निमंत्रित उपस्थित होते. हॅनोव्हर ट्रेड फेअरमध्ये गुंतवणूकदार आमच्या मेजवानीकडे आकर्षित होतील.

Web Title: Improvements to industry policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.