निवडणूक होताच इम्रान खान यांना १२ प्रकरणांत जामीन; तरीही तुरुंगातच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:44 IST2024-02-10T18:43:45+5:302024-02-10T18:44:03+5:30
इम्रान खान यांना 2022 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणून पदावरून हटवण्यात आले होते.

निवडणूक होताच इम्रान खान यांना १२ प्रकरणांत जामीन; तरीही तुरुंगातच राहणार
निवडणूक होताच पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १२ प्रकरणांत जामीन मिळाला आहे. पाकिस्तानाच सार्वजनिक निवडणुकीत खान यांना प्रचार करता येऊ नये म्हणून त्यांच्याविरोधात सैन्याने मोठे षडयंत्र रचले होते. यानुसार त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. आता सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले केल्याप्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान यांना जामीन दिला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला होता. इम्रान यांना अनेक प्रकरणांत अडकविण्यात आल्याने व सत्तेतून खाली खेचल्याने हा हिंसाचार झाला होता. यामुळे सैन्याच्या मालमत्तांवर हल्ले केल्या प्रकरणी इमरान खान, शाह महमूद यांच्यासह अनेक पीटीआय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इम्रान आणि कुरेशी यांना जामीन मिळाला तरी ते तुरुंगातच राहणार आहेत. या दोघांविरोधात आणखी काही खटले दाखल आहेत. इम्रान खान यांना 2022 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणून पदावरून हटवण्यात आले होते. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून इम्रानवर अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सरकारी भेटवस्तूंच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित असलेल्या तोशखाना प्रकरणात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय गुपिते लीक करण्यासंबंधीचा खटलाही प्रलंबित आहे.