RSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:29 PM2019-08-14T17:29:27+5:302019-08-14T17:30:02+5:30

RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.

Imran Khan compares RSS to 'Hitler's Nazis'; says PM Modi strategic blunder by abrogating Article 370 | RSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे

RSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे

Next

मुझफ्फराबादः भारतातल्या मोदी सरकारनं कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं. त्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, भारताविरोधात आगपाखड करत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत दाद मागण्याचा प्रयत्न करत आहे. कलम 370 रद्द करण्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भाजपा आणि आरएसएसवर टीका करत सुटले आहेत. RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.

नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळेच आज काश्मीरचा प्रश्न चिघळला. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिम उद्ध्वस्त होतील आणि त्यानंतर पाकिस्तानला टार्गेट करण्यात येईल. हा सर्व प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची पुनरावृत्ती आहे. काश्मीरचा नकाशा बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जातोय. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते, त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही आज जग गप्प असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.  

मोदी सरकारने संविधानातील 370 कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारतावर आगपाखड करत सुटला आहे. कलम 370 रद्द करणं ही भारताची घोडचूकच आहे. काश्मीरमधून पर्यटकांना बाहेर हाकलून सैन्य पाठवून भारतानं काय प्राप्त केलं आहे. मोदींनी ही घोडचूक केली आहे.

मोदी जो खेळ खेळत आहे, तो पुढे जाऊन भारताला महागात पडणार आहे. काश्मिरी लोकांसोबत मोदींनी विश्वासघात केला आहे. नेहरूंनी काश्मिरी लोकांना त्यांच्या अधिकारांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मोदी सरकार या उलट कृत्य करत सुटलं आहे. मोदी सरकारला मानवी मूल्य, आंतरराष्ट्रीत पातळीवरचा विरोध, शिमला करार याची काहीही पर्वा नाही. यांची विचारधारा नाझींसारखी झाली आहे. आरएसएसची विचारधाराही नाझींच्या विचारधारेच्या मार्गानं जात असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे. 

Web Title: Imran Khan compares RSS to 'Hitler's Nazis'; says PM Modi strategic blunder by abrogating Article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.