Imran Khan: 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान...'; बड्या सहकाऱ्याने साथ सोडली, औपचारिकता बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 09:21 AM2022-03-30T09:21:36+5:302022-03-30T09:21:56+5:30

Imran Khan No-Trust Motion इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे २४ खासदार बंडखोर आहेत. इम्रान खान यांचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांना केवळ 172 सदस्यांची गरज आहे.

Imran Khan: 'Former Prime Minister of Pakistan Imran Khan ...'; Big colleague MQM left, now formality left on No-Trust Motion | Imran Khan: 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान...'; बड्या सहकाऱ्याने साथ सोडली, औपचारिकता बाकी

Imran Khan: 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान...'; बड्या सहकाऱ्याने साथ सोडली, औपचारिकता बाकी

Next

भारताविरोधात गरळ ओकून पाकिस्तानचे पंतप्रधान झालेल्या इम्रान खान यांना खुर्ची सोडावी लागणार आहे. संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला असून उद्या त्यावर मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, त्या आधीच इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे इम्रान खान यांची रहस्यमयी पत्नी काळी जादू करत असल्याचे म्हटले जात आहे. 

 ज्या पक्षांच्या मदतीने इम्रान खान सत्तेत आले, त्यापैकी बड्या सहकाऱ्याने त्यांची साथ सोडली आहे. तर इम्रान यांच्याच पीटीआयमधील एक गटाने विरोधकांना साथ देण्याचे आधीच ठरविले आहे. इम्रान खान यांचा सहकारी पक्ष एमक्युएमने अविश्वास प्रस्तावाच्या आधीच विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पीपीपी प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी ट्विट केले की संयुक्त विरोधी पक्ष आणि एमक्यूएम यांच्यात एक करार झाला आहे. राबता समिती MQM आणि PPP CEC करारांना मान्यता देईल. यानंतर ते उद्या पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना अधिक माहिती देणार आहेत. MQM विरोधी गोटात गेल्याने इम्रान खान यांनी बहुमत गमावले आहे. 

पाकिस्तान संसदेत 342 सदस्य आहेत. बहुमतासाठी 172 सदस्य असणे आवश्यक आहे. एमक्यूएमने इम्रान खान यांचा पाठिंबा काढल्यानंतर विरोधकांकडे 177 सदस्यांचा पाठिंबा असेल. तर इम्रान खान यांना 164 संख्याबळ असेल. इम्रान खान यांचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांना केवळ 172 सदस्यांची गरज आहे. ती आता पूर्ण झाली आहे. 

इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे २४ खासदार बंडखोर आहेत. याशिवाय सरकारमधील मित्रपक्ष, एमक्यूएमपी, पीएमएलक्यू आणि जमहूरी वतन पक्षाने एका मागोमाग एक पाठिंबा काढला आहे. जम्हूरी वतन पक्षाचे पहिले नेते शाहजैन बुगती यांनी इम्रान मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. 

Web Title: Imran Khan: 'Former Prime Minister of Pakistan Imran Khan ...'; Big colleague MQM left, now formality left on No-Trust Motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.