पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा नवा विक्रम; वाचाल तर हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:39 PM2019-10-10T12:39:07+5:302019-10-10T12:40:27+5:30

इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानचा नवा विक्रम

Imran Khan govt borrows 7 5 trillion rupees in one year | पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा नवा विक्रम; वाचाल तर हसाल

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा नवा विक्रम; वाचाल तर हसाल

Next

इस्लामाबाद: पाकिस्तानमधीलइम्रान खान सरकारनं कर्जाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या वर्षभरात इम्रान खान यांच्या सरकारनं विक्रमी कर्ज घेतलं आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी सरकारनं वर्षभरात तब्बल ७५०९ अब्ज (पाकिस्तानी) रुपयांचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे देशावरील असलेल्या एकूण कर्जात मोठी वाढ झाली आहे. 

स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं सरकारला कर्जाच्या रकमेची माहिती पाठवली आहे. खान यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये पंतप्रधान पदाची धुरा खांद्यावर घेतली. यानंतरच्या वर्षभरात त्यांनी परदेशातून २८०४ अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं. तर देशांतर्गत संस्थांकडून ४७०५ अब्ज रुपये कर्ज म्हणून घेतले. त्यामुळे पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्यानं पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. 

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या दोनच महिन्यात पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जात १.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारलं, त्यावेळी देशावरील एकूण कर्ज २४,७३२ रुपये होतं. आता हा आकडा थेट ३२,२४० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 

एका बाजूला कर्जाचा डोंगर वाढत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सरकारकडे जमा होणारा कर अतिशय आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ ट्रिलियन रुपये कर गोळा करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं होतं. मात्र प्रत्यक्षात कर संकलन कमी झाल्यानं पाकिस्तान सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
 

Web Title: Imran Khan govt borrows 7 5 trillion rupees in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.