इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 09:27 PM2023-05-28T21:27:15+5:302023-05-28T21:27:45+5:30

Pakistan Political Crisis : कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, असाही आरोप राणा सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला.

imran khan is plotting against the country pak minister sanaullah made a big disclosure | इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा

इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा

googlenewsNext

पाकिस्तान हळूहळू आर्थिक संकटाच्या गर्तेत बुडत चालला आहे, पण पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. दरम्यान, इम्रान खानचा पक्ष कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा कट रचत आहेत, असे गुप्तचर यंत्रणांनी फोन टॅपिंगमधील संभाषण उघड केल्यावरून सूचित होते, असा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे. 

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, असाही आरोप राणा सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला. तसेच, राणा सनाउल्लाह यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे की, देशाच्या एजन्सींनी टेपिंगमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेत्याच्या घरावर छापा टाकला आणि बलात्काराचा खोटा खटला रचण्याचे संभाषण उघड केले आहे. मात्र, राणा सनाउल्लाह यांनी आपल्या दाव्याच्या बाजूने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी राणा सनाउल्लाह यांना प्रत्युत्तर दिले. राणा सनाउल्लाह हे स्पष्टपणे मीडियामध्ये येत असलेल्या बातम्या लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे इम्रान खान म्हणाले. तसेच, त्यांनी ट्विट केले की, तुरुंगात महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल काही शंका असेल, तर या प्रमाणित गुन्हेगाराच्या पत्रकार परिषदेने अशा सर्व शंका दूर कराव्यात. 

60 हून अधिक नेत्यांनी सोडला पक्ष
दरम्यान, 9 मेच्या घटनेनंतर इम्रान खान यांच्या पीटीआयमधील 60 हून अधिक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाचा त्याग करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सरचिटणीस असद उमर, ज्येष्ठ नेते फवाद चौधरी आणि माजी मंत्री शिरीन मजारी यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे 9 मे रोजी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून निमलष्करी दलाच्या जवानांनी अटक केली होती, त्यानंतर देशात हिंसक निदर्शने सुरू झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस, मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीसह डझनभर लष्करी आस्थापनांची तोडफोड केली होती.

Web Title: imran khan is plotting against the country pak minister sanaullah made a big disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.