पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पाकिस्तानला जाणार?; इम्रान खान यांचं आमंत्रण येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 03:54 PM2018-07-31T15:54:48+5:302018-07-31T15:56:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. तसेच पाकिस्तानमधील लोकशाही आणखी मजबूत होईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. त्यामुळेच आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींना इम्रान खान यांच्याकडून शपथविधी सोहळ्याची निमंत्रण

Imran Khan Likely to Invite Indian PM Narendra Modi to Pakistan For His Swearing-in Ceremony | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पाकिस्तानला जाणार?; इम्रान खान यांचं आमंत्रण येण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पाकिस्तानला जाणार?; इम्रान खान यांचं आमंत्रण येण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदीपाकिस्तान भावी पंतप्रधान इम्रान खान यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. तसेच पाकिस्तान लोकशाही आणखी मजबूत होईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. त्यामुळेच आता, पंतप्रधान नरेंद्र मोदीइम्रान खान यांच्याकडून शपथविधी सोहळ्याची निमंत्रण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 14 ऑगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा शपथविधी होईल, असा विश्वास ‘पीटीआय’ पक्षाने व्यक्त केला. तर 11 ऑगस्ट ही शपथविधीची तारीख ठरल्याचेही समजते.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूकांमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ(पीटीआय) पक्षाला निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. 270 जागांपैकी ‘पीटीआय’ पक्षाला 116 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 16 जागा कमी आहेत. मात्र, पीटीआयने 16 जागांची जुळवाजुळव शक्य असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी इम्रान खान शपथ घेतील, असेही पीटीआयने जाहीर केले आहे. त्यानंतरच, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन इम्रान खान यांना पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पाकिस्तानमधील लोकशाही बळकट होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यामुळे पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वीच इम्रान यांच्याकडे मैत्रीचा हात मोदींनी केल्याचे दिसून येते. पण, इम्रानही मोदींच्या आशावादाला खरे ठरवतील का हा येणार काळच ठरवले. मात्र, सध्यातरी इम्रान खान यांच्या शपथविधीची जोरदार चर्चा सुरू असून मोदींना या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर, भारत सरकारकडून या शपथविधी सोहळ्याला जायचे की नाही, याबाबतचा निर्णय होणार आहे.

दरम्यान, इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असल्याने या शपथविधी सोहळ्याला कपिल देव, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे भारताचे दिग्गज खेळाडू उपस्थित राहणार असल्याचा दावा RAW चे माजी प्रमुख एएस दौलत यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीती दौलत यांनी हा दावा केला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यास मोदीही या शपथविधी सोहळ्याला जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Imran Khan Likely to Invite Indian PM Narendra Modi to Pakistan For His Swearing-in Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.