पंतप्रधान निवासाऐवजी इम्रान खान राहणार लष्कर सचिव निवासात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:37 AM2018-08-21T08:37:29+5:302018-08-21T08:42:27+5:30

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान शासकीय पंतप्रधान निवासात राहणार नाही आहेत. पंतप्रधान निवासाऐवजी लष्कर सचिव निवासात इम्रान खान राहणार आहेत. लष्कर सचिव निवास 3 बेडरूम्सचा आहे. 

Imran Khan not to live in PM House, moves into military secretary's 3-bed room home | पंतप्रधान निवासाऐवजी इम्रान खान राहणार लष्कर सचिव निवासात

पंतप्रधान निवासाऐवजी इम्रान खान राहणार लष्कर सचिव निवासात

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी शासकीय पंतप्रधान निवासात राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान निवासाऐवजी लष्कर सचिव निवासात इम्रान खान राहणार आहेत.

बानिगाला येथील माझ्या स्वत:च्या घरी राहणार असल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या जिवाला धोका असल्याने त्याठिकाणी न राहण्याचा सल्ला गुप्तचर संस्थांनी दिला. त्यानंतर इम्रान खान यांनी लष्कर सचिव निवासात राहण्याचा निर्णय घेतला. लष्कर सचिव निवास 3 बेडरूम्सचा आहे.  

देशासमोर अनेक समस्या आहेत. बेकारी आणि भ्रष्टाचार या दोन समस्या दूर करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही इम्रान खान यांनी सांगितले. देशात काही जणांकडे खर्च करायला पैसा नाही, तर दुसरीकडे काही जण बादशाही थाटात राहत असल्याचे पाहायला मिळते. सध्या पंतप्रधान निवासात 224 नोकर आणि 80 मोटर गाड्या आहेत, 33 बुलेटप्रुफ कार, हेलिकॉप्टर आणि विमान आहे. मात्र, माझ्याजवळ फक्त 2 नोकर आणि 2 मोटरगाड्या ठेवणार असून बाकी बुलेटप्रुफ कार लिलावात विकून टाकणार असल्याचेही इम्रान खान म्हणाले. 

(इम्रान खान यांच्या पहिल्या भाषणात मोदींच्या स्वप्नांची झलक )

लालू यादव इम्रान खानचे राजकीय गुरू
इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या  नॅशनल असेंब्लीमध्ये दिलेले भाषण पंतप्रधान पदाला साजेशे नव्हते, अशी टीका पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते सय्यद खुर्शिद शाह यांनी केली आहे. या भाषणावरून भारतातील राजकीय नेते लालूप्रसाद यादव हे इम्रानचे राजकीय गुरू असावेत, असे वाटते, असे शाह म्हणाले. 

Web Title: Imran Khan not to live in PM House, moves into military secretary's 3-bed room home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.