इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:30 AM2018-12-23T05:30:08+5:302018-12-23T05:31:25+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली.
संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली.
काश्मीरविषयी इम्रान खान सरचिटणीसांशी नेमके काय बोलले, हे त्यांनी सांगितले नाही. त्या म्हणाल्या की, विविध देशांच्या प्रमुखांशी सरचिटणीसांचे बोलणे होत असते. मी एवढेच सांगू शकते की, इम्रान खान यांचे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आणि त्यात त्यांनी काश्मीरचा विषय काढला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व त्यात लुडबूड न करता पाकिस्तानने आपल्यापुरते बघावे, असे भारताने इम्रान खान यांना याआधीच सुनावले आहे. त्याविषयी विचारता स्टेफेन ड्युजारिक म्हणाल्या की, सरचिटणीसांनी काश्मीरबाबतच्या आमच्या भूमिकेचा पुनरुच्चार
केला. (वृत्तसंस्था)
हा दुटप्पीपणा
दुसऱ्या बाजूने केल्या जाणाºया विधानांवरून त्यांचा अप्रामाणिकपणा आणि दुटप्पीपणाच दिसून येतो.
-रवीश कुमार, प्रवक्ते,
परराष्ट्र मंत्रालय