शक्तिप्रदर्शनासाठी इम्रान खान सज्ज

By admin | Published: October 30, 2016 02:15 AM2016-10-30T02:15:34+5:302016-10-30T02:15:34+5:30

माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक-इ-इन्साफ पक्षाचे प्रमुख यांनी २ नोव्हेंबरपासून इस्लामाबादामध्ये सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी तयार राहा, अशा सूचना दिल्या आहेत.

Imran Khan ready for showcasing | शक्तिप्रदर्शनासाठी इम्रान खान सज्ज

शक्तिप्रदर्शनासाठी इम्रान खान सज्ज

Next

लाहोर : माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक-इ-इन्साफ पक्षाचे प्रमुख यांनी २ नोव्हेंबरपासून इस्लामाबादामध्ये सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी तयार राहा, अशा सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नवाज शरीफ सरकार भ्रष्ट असून, त्याच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन कोणत्याही प्रकारे दाबून टाकण्याच्या सूचना शरीफ सरकारने पोलिसांना दिल्या आहेत.
परदेशातील काळा पैसा प्रकरणात नवाज शरीफ यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. नवाज शरीफ हे हुकूमशहा असून, देशात लोकशाहीची स्थापना करणे हा आमचा हेतू असल्याचेही खान यांनी जाहीर केले आहे.
तुम्हाला नवाज शरीफ सरकार अटक करण्याचा प्रयत्न करेल, पण अटक टाळून, तुम्ही सर्वांनी २ नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये या, असे आवाहन त्याने केले आहे. या आंदोलनामध्ये लाखो लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. खैबर पख्तुनवालामध्ये इम्रान खान यांचा पक्ष सत्तेवर आहे. त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात लोक इस्लामाबादला येण्याची शक्यता आहे. तेथील मुख्यमंत्री, मंत्री वा असेंब्लीचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले, तर त्यांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक दिली जाईल, अशी धमकी गृह मंत्रालयाने दिली आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे शरीफ सरकार भलतेच अस्वस्थ झाले असून, हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत इम्रान खान यांच्या ६00 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तहरीक-इ-इनसाफचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शुक्रवारी इस्लामाबाद व रावळपिंणीमध्ये चकमकी उडाल्या होत्या. (वृत्तसंस्था)

नजरकैदेत : इस्लामाबाद बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे
राज्यमंत्री अबिद शेर अली यांनी जाहीर केले आहे. इस्लामाबाद बंद करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची खैर केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान यांना इस्लामाबादमधील घरातच पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. काल इस्लामाबादमध्ये जमलेल्या इम्रान समर्थकांवर पोलिसांनी अश्रुधूर सोडला आणि लाठीमारही केला.

Web Title: Imran Khan ready for showcasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.