इम्रान खान यांनी लष्करप्रमुखाची नियुक्ती करण्यासाठी मला विनंती केली; पीएम शाहबाज यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 01:02 PM2022-10-30T13:02:06+5:302022-10-30T13:03:08+5:30

"माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याला परस्पर सल्लामसलत करून पाकिस्तानी लष्कराच्या पुढील प्रमुखाची नियुक्ती करण्याची ऑफर दिली होती, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. 

Imran Khan requested me to appoint the Army Chief Claim of Pakistan PM Shahbaz | इम्रान खान यांनी लष्करप्रमुखाची नियुक्ती करण्यासाठी मला विनंती केली; पीएम शाहबाज यांचा दावा

इम्रान खान यांनी लष्करप्रमुखाची नियुक्ती करण्यासाठी मला विनंती केली; पीएम शाहबाज यांचा दावा

Next

इस्लमाबाद: "माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याला परस्पर सल्लामसलत करून पाकिस्तानी लष्कराच्या पुढील प्रमुखाची नियुक्ती करण्याची ऑफर दिली होती, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. 

शाहबाज यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे. त्यांनी ही विनंती स्वीकारण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. माजी पंतप्रधान इम्रान यांनी बाजवा यांचा कार्यकाळ वाढवला, जे २०१६ मध्ये लष्करप्रमुख झाले.

सुनक यांचाही नंबर? रशियाने ब्रिटनच्या लिझ ट्रस यांचा मोबाईल हॅक केलेला; जगातील बड्या नेत्यांसोबतचे सीक्रेट चॅट लीक


"पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ प्रमुख इम्रान यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी नवीन लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीसाठी सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याची ऑफर दिली होती. इम्रान यांनी हा मेसेज परस्पर व्यापारी मित्रामार्फत पाठवला होता, असंही शाहबाज म्हणाले. 

'इमरान खान यांनी बोलण्याची ऑफर दिली. पहिला मुद्दा लष्करप्रमुखांबाबत होता आणि दुसरा लवकरच निवडणुका घेण्याचा होता. इम्रान यांनी त्यांना प्रस्ताव दिला होता की लष्करप्रमुखासाठी सरकारने त्यांना तीन नावे सुचवावीत आणि सहा नावांपैकी एक नाव देशाचा पुढचा लष्करप्रमुख होऊ शकेल यासाठी ते तीन नावे सरकारला देतील, असंही शाहबाज म्हणाले. 

मी त्यांना 'धन्यवाद' म्हणत इम्रान यांची ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. दोन्ही यादीत एकच नाव असेल तर सरकार मान्य करेल, असे शाहबाज म्हणाले. 

शाहबाज यांनी इम्रान यांना लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवर चर्चेचा आग्रह धरला. आयएसआयचे महासंचालक आणि लष्कराची मीडिया शाखा, आयएसपीआर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला त्यांची मंजुरी मिळाल्याचेही शाहबाज म्हणाले.

आयएसआय प्रमुखाला पत्रकार परिषद हवी होती कारण लष्करप्रमुख आणि इम्रान यांच्यातील बैठकीचे ते एकमेव साक्षीदार होते. आयएसआय प्रमुखांनी हे संपूर्ण प्रकरण जगासमोर ठेवले. इम्रान केवळ आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लष्कराचे नेतृत्व खुणावत असल्याचे शाहबाज म्हणाले. 

Web Title: Imran Khan requested me to appoint the Army Chief Claim of Pakistan PM Shahbaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.