इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:27 PM2020-07-01T13:27:04+5:302020-07-01T13:31:37+5:30
हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले.
इस्लामाबाद - कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी सांगितले. सोमवारी
झालेल्या या हल्ल्यात ९ जण मृत्युमुखी पडले आणि ७ जण जखमी झाले. त्यात हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी संसदेत सांगितले की, अर्थातच स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचीही भूमिका होती. मात्र, हल्ल्याचा दावा बलुचिस्तानच्या लष्कराने केला आहे. ४ दहशतवादी हल्ला करण्यासाठी वाहनातून आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि एके - 47 रायफल जप्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी कराचीमधील चिनी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी त्याने घेतली होती. त्या हल्ल्यातही अशीच कार वापरली गेली.
परराष्ट्रमंत्र्यांनीही भारताला जबाबदार धरले
पंतप्रधानांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्या बलूच लष्कराचा भारताशी थेट संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, कुरेशी यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. पाकिस्तान आपल्या देशांतर्गत समस्यांचा दोष आमच्यावर ठेवू शकत नाही. जगातील कोणत्याही भागात दहशतवादावर टीका करण्यास भारत कचरत नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न
सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल
थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या
TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह
ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात