अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदा पाकला पाठवले निमंत्रण, पण इम्रान खान सरकारने फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 08:49 PM2021-12-09T20:49:51+5:302021-12-09T21:02:27+5:30

Imran Khan to skip Biden’s democracy summit : शिखर परिषदेत अमेरिकेने श्रीलंका, बांगलादेश, चीन आणि रशियाला बाजूला ठेवून पाकिस्तानला बोलावण्याचा निर्णय घेतला होता.

Imran Khan to skip Biden’s democracy summit, PM Modi to speak about democratic commitments | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदा पाकला पाठवले निमंत्रण, पण इम्रान खान सरकारने फेटाळले

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदा पाकला पाठवले निमंत्रण, पण इम्रान खान सरकारने फेटाळले

Next

पाकिस्तानच्याइम्रान खान सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बोलावलेल्या व्हर्च्युअल लोकशाही शिखर परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. मात्र, या शिखर परिषदेपासून दूर राहण्याचे पाकिस्तानच्या बाजूने कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

आजपासून सुरू होणाऱ्या या लोकशाही शिखर परिषदेत अमेरिकेने श्रीलंका, बांगलादेश, चीन आणि रशियाला बाजूला ठेवून पाकिस्तानला बोलावण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बायडन सरकारकडून लक्ष न दिल्याने पाकिस्तान नाराजी व्यक्त करत आहे, मात्र अमेरिकेकडून पहिल्यांदाच विशेष परिषदेचे निमंत्रण आले असताना पाकिस्तानने नकार दिला आहे.

पाकिस्तानी न्यूज वेबसाईट 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा खास मित्र चीनला व्हाईट हाऊसकडून शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यामुळे पाकिस्ताननेही उपस्थित राहण्यास नकार दिला आहे, असे म्हटले जात आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचेही बोलले जात आहे. पाकिस्तानने शिखर परिषदेतून माघार घेण्याचे हेही एक कारण असू शकते.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  9 आणि 10 डिसेंबर रोजी लोकशाही  शिखर परिषदेचे आयोजन करत आहेत, ज्यात भारतासह 100 हून अधिक देशांचे राजकारणी सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेत दक्षिण आशियातील केवळ चार देशांना बोलावण्यात आले असून त्यात भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे.

रशिया आणि चीनला शिखर परिषदेपासून दूर ठेवण्यात आले आहे. चीनशी एकता दाखवण्याच्या उद्देशाने पाकिस्तान या शिखर परिषदेत सहभागी होत नसल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या या निर्णयावर चीनचा किती प्रभाव आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या मुद्द्यावर पाकिस्तानने चीनशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: Imran Khan to skip Biden’s democracy summit, PM Modi to speak about democratic commitments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.