पाकिस्तानमध्ये परिस्थिती भीषण! इम्रान समर्थकांनीही चोरल्या बकऱ्या; 8 जणांचा मृत्यू, 300 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 11:14 AM2023-05-11T11:14:40+5:302023-05-11T11:15:42+5:30

पेशावरमधील 'रेडिओ पाकिस्तान'च्या इमारतीला आग लागली तर देशातील इतर अनेक भागात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी दुकानेही लुटण्यात आली आहेत. 

imran khan supporters stolen many goats during protest in pakistan | पाकिस्तानमध्ये परिस्थिती भीषण! इम्रान समर्थकांनीही चोरल्या बकऱ्या; 8 जणांचा मृत्यू, 300 जखमी

पाकिस्तानमध्ये परिस्थिती भीषण! इम्रान समर्थकांनीही चोरल्या बकऱ्या; 8 जणांचा मृत्यू, 300 जखमी

googlenewsNext

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, खैबर पख्तुनख्वा आणि इस्लामाबादमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. कार्यकर्ते देशभरात हिंसक आंदोलन करत आहेत. पेशावरमधील 'रेडिओ पाकिस्तान'च्या इमारतीला आग लागली तर देशातील इतर अनेक भागात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी दुकानेही लुटण्यात आली आहेत. 

पेशावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे जवळपास 20 बकऱ्या जिवंत जाळण्यात आल्या आणि उर्वरित बकऱ्या आंदोलकांनी चोरून नेल्या. या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यात असे म्हटले आहे की, बकऱ्या चोरणारे लोक पीटीआयचे कार्यकर्ते होते. या लोकांनी चारगानो चौक उर्फ ​​बच्चा खां चौकातून या बकऱ्या चोरल्या असून तेथे बकऱ्या, ससे, कबुतर, माकडांची विक्री केली जाते.

यापूर्वी आंदोलनादरम्यान आंदोलक मोर आणि स्ट्रॉबेरी चोरताना दिसले होते. एका व्हिडिओमध्ये मोरासोबत दिसणारी व्यक्ती हा जनतेचा पैसा आहे, म्हणून आम्ही मोर घेत आहोत, असे म्हणताना दिसत आहे. एवढेच नाही तर आंदोलकांनी स्टेशनरीच्या वस्तू, फ्रोझन स्ट्रॉबेरी आणि कॉर्प्स कमांडरचा गणवेशही चोरला.

आठ जणांचा मृत्यू, 300 लोक जखमी 

डॉनच्या वृत्तानुसार, पीटीआयच्या अध्यक्षाच्या अटकेमुळे उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 300 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीटीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष फवाद चौधरी, माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी, केंद्रीय सरचिटणीस असद उमर यांना रात्री उशिरा ताब्यात घेतल्यानंतर लष्कर तैनात करण्यात आलं आहे. लाहोर आणि रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयाचे एक गेट तोडले.

शहबाज शरीफ यांच्या घरावर हल्ला 

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाशी संबंधित सुमारे 500 जण बुधवारी शाहबाज यांच्या लाहोरमधील निवासस्थानी पोहोचले आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इम्रान खान यांच्या या समर्थकांनी शहबाज यांच्या निवासी संकुलात पेट्रोल बॉम्बही फेकले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: imran khan supporters stolen many goats during protest in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.