इम्रान खान यांना कोर्टातूनच उचलले, पॅरामिलिटरी रेंजर्स दरवाजा तोडून आत घुसले अन् केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:20 AM2023-05-10T05:20:17+5:302023-05-10T05:22:36+5:30

या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली असून इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

Imran Khan was arrested from the court itself, paramilitary rangers broke the door and entered and arrested him | इम्रान खान यांना कोर्टातूनच उचलले, पॅरामिलिटरी रेंजर्स दरवाजा तोडून आत घुसले अन् केली अटक

इम्रान खान यांना कोर्टातूनच उचलले, पॅरामिलिटरी रेंजर्स दरवाजा तोडून आत घुसले अन् केली अटक

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (वय ७० वर्षे) यांना पॅरामिलिटरी रेंजर्सनी मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात अटक केली. रेंजर्स न्यायालयाच्या खिडकीच्या काचा, दरवाजा तोडून आत घुसले आणि थेट इम्रान खान यांना उचलले. त्यांच्या कॉलरला पकडून त्यांना गाडीत बसवले. त्यांच्या भोवती अनेक रेंजर्सचा गराडा होता.

या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजली असून इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी रावळपिंडी येथील लष्कर मुख्यालयावर व लाहोर येथील कॉर्प्स कमांडरच्या घरावर चाल केली. कमांडरच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. रस्त्यावरील अनेक वाहनांची जाळपोळही त्यांनी केली.

कसे घडले अटकनाट्य?

लाहोरहून इस्लामाबादला आलेले इम्रान खान उच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी बायोमेट्रिक तपासणी प्रक्रियेतून जात असताना पॅरामिलिटरी रेंजर्सनी त्या कक्षाची काच तोडली. त्यानंतर इम्रान खान यांना अटक करण्यात आली. त्यांनी ढकलत नेले. यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक, वकिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या नेत्या शिरीन मजारी यांनी केला.

आयएसआय अधिकाऱ्यावर आरोप भोवले?

इम्रान खान व त्यांची पत्नी बुशरा बिबी यांच्या अल-कादीर ट्रस्टला बहरिया टाऊन या कंपनीने ५३ कोटी रुपयांची जमीन लाच म्हणून देऊ केली, असा आरोप असून त्या प्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे इस्लामाबाद पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानातील नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोने (एनएबी) जारी केलेल्या निवेदनात याच प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

अटक वॉरंट कधी जारी झाले?

इम्रान खान यांच्या अटकेचे वॉरंट १ मे रोजीच जारी झाले होते, अशी माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या अटकेचे वॉरंट मंगळवारी सकाळी जारी झाले, असा नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोचा दावा आहे.

Web Title: Imran Khan was arrested from the court itself, paramilitary rangers broke the door and entered and arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.