इम्रान खानचे आंदोलन लांबणीवर
By admin | Published: December 17, 2014 02:20 AM2014-12-17T02:20:06+5:302014-12-17T02:20:06+5:30
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांनी देशभरात १८ डिसेंबर रोजी होणारे सरकारविरोधी आंदोलन पुढे ढकलले
Next
इस्लामाबाद : या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांनी देशभरात १८ डिसेंबर रोजी होणारे सरकारविरोधी आंदोलन पुढे ढकलले. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात विरोधी पक्षांकडून सरकाविरोधात आंदोलन सुरु आहे. यास पाकमधील शक्तीशाली लष्कर व गुप्तहेर संस्था आयएसआयएसची फूस असल्याचे बोलले जाते. पक्षाचे पंजाब प्रांत प्रमुख एजाज चौधरी यांनी आंदोलन पुढे ढकण्याचा प्रस्ताव इम्रान खानकडे पाठविला होता.