Imran Khan, Farah Khan: पाकिस्तान कंगाल, इम्रान खान बेहाल; पण लाडकी मेहुणी झाली मालामाल, एवढी संपत्ती वाढली की...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:18 PM2022-04-07T14:18:54+5:302022-04-07T14:19:43+5:30

Farah Khan Property, Wealth: विरोधकांसोबतच इम्रान खानच्या जवळचे लोकही फराह खानवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अलीम खान यांनी फराहवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

Imran Khan's close sister-in-law Farah Khan became Reacher in poor Pakistan; Bushra bibi's close friend fled to UAE | Imran Khan, Farah Khan: पाकिस्तान कंगाल, इम्रान खान बेहाल; पण लाडकी मेहुणी झाली मालामाल, एवढी संपत्ती वाढली की...

Imran Khan, Farah Khan: पाकिस्तान कंगाल, इम्रान खान बेहाल; पण लाडकी मेहुणी झाली मालामाल, एवढी संपत्ती वाढली की...

Next

पाकिस्तानातील राजकीय संकटामुळे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता गेलेली असताना त्यांची काळी जादू करणारी बायको आणि लाडकी मेहुणी यांची मात्र जगभरात चर्चा आहे. रहस्यमयी पत्नी पत्नी बुशरा बीबीची खास मैत्रिण फराह खानची संपत्ती इम्रान खान यांच्या कार्यकाळात चौपट वेगाने वाढली आहे. आता या फराह खानने पाकिस्तानही सोडले आहे. 

२०१७ मध्ये फराह खानने आपली संपत्ती 23 करोड़ 16 लाख पाकिस्तानी रुपए सांगितली होती. जी 2021 मध्ये वाढून 97 करोड़ 10 लाख पाकिस्तानी रुपए एवढी वाढली आहे. अद्याप २०२२ ची संपत्ती बाहेर यायची आहे. फराह खान ही पाकिस्तानात आणखी दोन नावांनी वावरते. फरहत शहजादी आणि फराह गुज्जर या नावानेही ती ओळखली जाते. 

विरोधकांसोबतच इम्रान खानच्या जवळचे लोकही फराह खानवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अलीम खान यांनी फराहवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. फराह खानला पंजाब प्रांतात प्रत्येक नियुक्ती आणि बदलीसाठी लाखो रुपये मिळत होते. फराहने अनेक शहरांमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या असून अनेक व्यावसायिक क्षेत्रात लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला होता. 

लाहोर आणि इस्लामाबादमध्ये मालमत्ता खरेदी 
कागदपत्रांनुसार, फराह खानने 2019 मध्ये कर माफी योजनेचा फायदा घेऊन काळा पैसा पांढरा केला आणि योजनेअंतर्गत 328 दशलक्ष (32 कोटी 80 लाख) रुपयांची मालमत्ता घोषित केली. फराह खानने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये आलिशान मालमत्ता खरेदी केल्याचेही म्हटले आहे. त्यात इस्लामाबादच्या आलिशान परिसरात बांधलेल्या व्हिलाचाही समावेश आहे. पाकिस्तानबाहेर UAE मध्ये फ्लॅट घेतला. त्याची किंमत 1 कोटी 57 लाख 49 हजार 479 रुपये होती.
फराह खानने इस्लामाबादच्या सेक्टर F-7/2 मध्ये 933 स्क्वेअर यार्डचे घर दाखवले आहे, जे तिने 195 मिलियन (19 कोटी 50 लाख) मध्ये खरेदी केले आहे. 2018 मध्ये तिने कर भरला नाही. पण उस्मान बुजदार पाकिस्तानी पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरातच फराह खानच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली. तिच्या पतीने आधीच पाकिस्तान सोडले होते. यानंतर तिने ३ एप्रिलला पाकिस्तान सोडले आहे. 

Web Title: Imran Khan's close sister-in-law Farah Khan became Reacher in poor Pakistan; Bushra bibi's close friend fled to UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.