इमरानच्या माजी पत्नीचा कॉकपीटमधून प्रवास, वैमानिकाची चौकशी
By admin | Published: December 4, 2015 04:21 PM2015-12-04T16:21:51+5:302015-12-04T16:31:50+5:30
इमरान खानची माजी पत्नी रेहाम खानला कॉकपीटमध्ये बसण्याची परवानगी दिली म्हणून वैमानिकाची चौकशी.
ऑनलाईन लोकमत
लाहोर, दि. ४ - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा प्रमुख इमरान खानची माजी पत्नी रेहाम खानला विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून प्रवास करायची परवानगी दिली म्हणून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने वैमानिकाची चौकशी सुरु केली आहे.
लंडन ते लाहोर प्रवासा दरम्यान रेहाम खानने काही मिनिट वैमानिकांसाठी असलेल्या कॉकपीटमध्ये बसून प्रवास केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. रेहामने कॉकपीटमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली आणि वैमानिकाने लगेच तिची विनंती मान्य केली अशी माहिती पीआयए विमान कंपनीचा प्रवक्ते डॅनियल गिलानी यांनी दिली.
वैमानिकाने सौजन्य दाखवले असले तरी, पीआयए नियमांकडे दुर्लक्ष करणार नाही. नियमानुसार वैमानिकाव्यतिरिक्त कॉकपीटमधून कोणीही प्रवास करु शकत नाही असे गिलानी यांनी सांगितले.