पाकिस्तानात ‘पिठा’च्या वाहनांमागे बाईक्सच्या रांगा, बंदुकीच्या मदतीनं संरक्षण; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:12 PM2023-01-17T12:12:32+5:302023-01-17T12:12:47+5:30
पाकिस्तानात पीठासाठी हाणामारीदेखील सुरु असल्याचं दिसून येतं.
पाकिस्तानमध्ये पिठाचा तुटवडा असताना लोकांनी दुकानदारांवर पीठ जास्त किमतीत विकल्याचा आरोप केला आहे. पाक मीडियानुसार कराचीमध्ये १ किलो पिठासाठी १८० रुपये मोजावे लागतात. पाकिस्तान सरकारने दिलेले पीठ निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही जनतेने केला आहे.
खरे तर पाक सरकारने स्वस्त पिठासाठी तैनात केलेल्या ट्रकवर लोकांची झुंबड उडत आहे. पाकिस्तानमध्ये लोक रेशनच्या ट्रकच्या मागे बाईक्सवर मागे जात असल्याचेही दिसत आहे. यानंतरही अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. तसंच गाडीच्या मागे लोक धावतानाही दिसत आहेत. इतकंच नाही तर बंदुकीच्या सहाय्याने लोकांच्या गर्दीतून पिठाच्या पिशव्यांचं संरक्षण केलं जातंय.
पिठाच्या तस्करीचा आरोप
पीठाचा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेतही गाजत आहे. आमचं पीठ कोण चोरतंय? असा सवालही विरोधकांनी संसदेत केला. तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाकिस्तान सरकारवर पिठाची तस्करी केल्याचा आरोप केलाय. पाकिस्तानचे पीठ अफगाणिस्तानात तस्करी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
This isn’t a motorcycle rally, ppl in #Pakistan are desperately chasing a truck carrying wheat flour, hoping to buy just 1 bag. Ppl of #JammuAndKashmir should open their eyes. Lucky not to be #Pakistani & still free to take decision about our future. Do we have any future with🇵🇰? pic.twitter.com/xOywDwKoiP
— Prof. Sajjad Raja (@NEP_JKGBL) January 14, 2023
खैबर पख्तूनख्वाचे सिनेटर मुश्ताक अहमद खान म्हणाले की, पिठाच्या किमती वाढल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. पहिल्यांदाच लहान मुलांसह महिला पीठासाठी रस्त्यावर उतरत आहेत.
Situation in #Sindh
— ᴴᵘᵐˢᵃᶠᵃʳ (@humsafar2706) January 10, 2023
Food crisis in Neuclear Power People r fighting for 10 kg bag of flour 🤔🤔🤔🤔 pic.twitter.com/ChWGDfOk5Z
सरकारविरोधात संताप
अनेक नागरिकांनी सरकारविरोधात नाराजी आणि संताप व्यक्त केला. लोकांनी पाकिस्तान सरकारवर अत्याचारी असल्याचा आरोप केला आहे. लोक सकाळी ६ वाजल्यापासून येथे पीठ घेण्यासाठी येतात. तेथे लहान मुले व महिला बसल्या आहेत. तक्रार कोणाकडे करायची, कुठे जायचे? आमची मुलं पीठासाठी रस्त्यावर बसली आहेत, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले.