परीक्षेत भाऊ-बहिणीच्या शारीरिक संबंधांवर प्रश्न विचारल्याने वाद; विद्यापीठाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:53 AM2023-02-24T10:53:35+5:302023-02-24T10:53:44+5:30

बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (बीईई) च्या विद्यार्थ्याला ‘ज्युली आणि मार्क परिदृश्य’ शीर्षकाचा परिच्छेद वाचून एक निबंध लिहिण्यास सांगितले होते

In Pakistan Controversy by asking questions on siblings' physical relations in exams; University action | परीक्षेत भाऊ-बहिणीच्या शारीरिक संबंधांवर प्रश्न विचारल्याने वाद; विद्यापीठाची कारवाई 

परीक्षेत भाऊ-बहिणीच्या शारीरिक संबंधांवर प्रश्न विचारल्याने वाद; विद्यापीठाची कारवाई 

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका विद्यापीठाच्या परीक्षेत भाऊ आणि बहिणीच्या शारीरिक संबंधांवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वादाला तोंड फुटले. त्यानंतर विद्यापीठाला कारवाई करावी लागली.

बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (बीईई) च्या विद्यार्थ्याला ‘ज्युली आणि मार्क परिदृश्य’ शीर्षकाचा परिच्छेद वाचून एक निबंध लिहिण्यास सांगितले होते. प्रश्नामध्ये ‘ज्युली आणि मार्क भाऊ आणि बहीण आहेत. कॉलेजमधून उन्हाळ्याच्या सुट्टीत ते फ्रान्समध्ये एकत्र प्रवास करत आहेत. एके रात्री ते समुद्रकिनाऱ्यावर एकटेच राहिले. त्यांनी ठरवले की, जर त्यांनी प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर ते मनोरंजक आणि मजेदार असेल. किमान, त्याच्यासाठी हा एक नवीन अनुभव असेल, असे म्हटले होते. प्रश्नांमध्ये, विद्यार्थ्यांना ज्युली आणि मार्कचे ‘प्रेमात’ असणे ठीक आहे का, असे विचारण्यात आले होते. हा प्रश्न व्हायरल होताच वाद निर्माण झाला होता.

Web Title: In Pakistan Controversy by asking questions on siblings' physical relations in exams; University action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.