पाकिस्तानात पेट्रोल चक्क ३०० रुपये लीटर; व्यापारी रस्त्यावर, सरकारला अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:32 AM2023-09-04T07:32:45+5:302023-09-04T07:32:51+5:30
देशात गदारोळ सुरू झाल्याने हंगामी पंतप्रधान अन्वारुल हक काकड यांनी आपला केनिया दौरा रद्द केला आहे.
कराची : पाकमध्ये वाढती महागाई आणि वीज बिलांच्या विरोधात शनिवारी व्यापारी रस्त्यावर उतरले. लाहोर, कराची व पेशावरपासून देशभरात दुकाने बंद होती.
देशात गदारोळ सुरू झाल्याने हंगामी पंतप्रधान अन्वारुल हक काकड यांनी आपला केनिया दौरा रद्द केला आहे. कराची येथील ताजिर कृती समितीने शुक्रवारी सरकारला वीज बिल कमी करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली. सरकारने तसे न केल्यास
१० दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला. (वृत्तसंस्था)
व्यापारी म्हणतात...
जर पंतप्रधानांना आमच्या समस्या जर समजल्या नाही तर आम्हाला इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असे कराचीतील व्यापारी फाहद अहमद यांनी सांगितले. मी एक लाख रुपये भाडे देईन व वीज बिलही तेवढेच येणार असेल तर मी कसे जगणार? पाकमध्ये महागाई दर २७.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ३०० रुपयांवर पोहोचली आहे.