महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 08:36 AM2023-10-24T08:36:30+5:302023-10-24T08:36:50+5:30
इस्रायल सैन्य गाझामध्ये दाखल होताच हमासशी पहिल्यांदाच जमिनीवरील टक्कर झाली आहे. हमासने इस्रायलच्या सैन्यावर अँटी टँक मिसाईल डागल्या आहेत.
गेल्या १७ दिवसांपासून धगधगत असलेली गाझा पट्टी जगाला महायुद्धाकडे घेऊन जात आहे. इस्रायल ज्या पद्धतीने गाझावर बॉम्ब टाकत आहे, ते पाहता हे युद्ध महायुद्धात बदलण्यास वेळ लागणार नाही असे संकेत आहेत. मध्य पूर्वेकडील ५७ देशांनी इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये घुसले तर युद्धाचे नवीन मोर्चे सुरु होतील, अशी धमकी दिली आहे. तरी देखील इस्रायल सैन्य गाझाच्या हद्दीत दाखल झाले आहे.
इस्रायल सैन्य गाझामध्ये दाखल होताच हमासशी पहिल्यांदाच जमिनीवरील टक्कर झाली आहे. हमासने इस्रायलच्या सैन्यावर अँटी टँक मिसाईल डागल्या आहेत. इस्रायलने कुठे कुठे युद्ध सुरु होऊ शकते याचा आढावा घेतलेला आहे. यामुळे इस्रायलने थेट सिरीयावर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सिरीयाला दमिश्क आणि अलेप्पो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावे लागले आहेत.
हे युद्ध आता इस्रायल विरोधात ५७ देश असे राहिलेले नाहीय तर यात रशिया आणि चीनचीही एन्ट्री झालेली आहे. अमेरिकेनंतर चीनच्या एक-दोन नव्हे तर सहा युद्धनौका बॅकअपसाठी अरबी समुद्रात पोहोचल्या आहेत. अरबी समुद्रात चीनच्या सहा युद्धनौकांच्या उपस्थितीमुळे तणाव वाढला आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी काळ्या समुद्रात लढाऊ विमाने तैनात केली आहेत. येमेनमधून एक-दोन नव्हे तर तीन क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली होती. इराणने इस्रायलविरुद्धच्या युद्धाला जागतिक युद्धात रूपांतरित करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या स्पेशल-9 प्लॅननुसार नऊ टीमना नऊ शस्त्रास्त्रे देण्यात येणार आहेत.
यामध्ये फतह-11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, स्कड क्षेपणास्त्र, कहार-1 क्षेपणास्त्र, खैबर शिकन क्षेपणास्त्र, बद्र-1 क्षेपणास्त्र, बुरकान-2 एच क्षेपणास्त्र, कियाम क्षेपणास्त्र, शॉर्ट रेंज रॉकेट, शाहेद 131/136 आत्मघाती ड्रोन यांचा समावेश आहे. गुप्तचर अहवालानुसार इस्रायलला नऊ आघाड्यांवर घेरले जाईल. लेबनॉन, सीरिया, वेस्ट बँक, जॉर्डन, इजिप्त, भूमध्य समुद्र, लाल समुद्र आणि इराक या नऊ आघाड्या आहेत.