'या' देशात आता प्रत्येक ठेंबाचा हिशोब द्यावा लागणार; पाणी वापरावर कठोर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 02:40 PM2023-04-01T14:40:57+5:302023-04-01T14:41:19+5:30
देशात सलग ४ वर्ष पावसाची कमतरता असल्याने यंदा दुष्काळाचं अभूतपूर्व संकट ट्यूनिशियावर कोसळले आहे
माणसाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र गंभीर दुष्काळात अडकलेल्या आफ्रिकातील उत्तरी देश ट्यूनिशियानं पाण्याच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. सरकारने एक जलयोजना प्रणाली सुरू करत कृषीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. देशात एकीकडे उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त राष्ट्राला पाण्याच्या वापरावर कठोर निर्बंध लागू केलेत.
कार धुण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणे आणि शेतीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर निर्बंध आहेत. अल जजीरानं सांगितले की, ट्यूनिशियाच्या नॅशनल वॉटर यूटिलिटी सोनडेनुसार, आफ्रिकी देशात ट्यूनिशिया देशात आतापर्यंत सर्वात वाईट दुष्काळाला सामोरे जात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने नागरिकांना रात्री ७ तास होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज रात्री ९ ते सकाळी ४ वाजेपर्यंत पाणी बंद केले जाईल असं सोनडे म्हणाले.
रमजानची सुरुवात झाल्यानंतर जेव्हा अनेक लोक उशिराने उठतात. राजधानी ट्यूनिसच्या अनेक भागात रहिवाशांना रात्रीच्या वेळी पाण्याची समस्या जाणवत असल्याची तक्रार येत होती. पाणी पुरवठा योग्य होत नसल्याच्या तक्रारी लोक करत होती. तिथे आता सरकारनेच रात्रीचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सलग ४ वर्ष पावसाची कमतरता असल्याने यंदा दुष्काळाचं अभूतपूर्व संकट ट्यूनिशियावर कोसळले आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून व्हावा यासाठी नागरिकांसाठी रात्री होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं पालन करावं असं सोनडे नेते मोस्बाह हलाली यांनी सांगितले आहे. त्याचसोबत जर कुणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दंड आणि जेलची शिक्षा भोगावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.