चुकून निर्वस्त्र सेल्फी टाकली, शिक्षिकेने नोकरी गमावली
By admin | Published: August 19, 2014 11:51 AM2014-08-19T11:51:28+5:302014-08-19T11:51:28+5:30
रशियातील एका संगीत शिक्षिकेला सोशल नेटवर्किंग साईट्सवर निर्वस्त्र सेल्फी टाकणे चांगलेच महागात पडले आहे. निर्वस्त्र अवस्थेतील सेल्फी टाकणा-या या शिक्षिकेला शाळा नोकरी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. १९ - रशियातील एका संगीत शिक्षिकेला सोशल नेटवर्किंग साईट्सवर निर्वस्त्र सेल्फी टाकणे चांगलेच महागात पडले आहे. निर्वस्त्र अवस्थेतील सेल्फी टाकणा-या या शिक्षिकेला शाळा नोकरी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिक्षिकेने नोकरी सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिक्षिकेची निर्वस्त्र सेल्फी हा सध्या रशियात चर्चेचा विषय ठरला आहे.
रशियातील एका शाळेत संगीताचे धडे देणा-या एलेना कॉर्नीशॉलकोव्हा या ४० वर्षीय शिक्षिकेने काही दिवसांपूर्वी चुकून सोशल नेटवर्किंग साईट्सवर तिची निर्वस्त्र सेल्फी अपलोड केली. ही सेल्फी अवघ्या काही तासांमध्ये सर्वत्र शेअर होऊ लागली. हा प्रकार शाळा प्रशासनाच्या लक्षात आला आणि त्यांनी या शिक्षिकेला २५ ऑगस्टपर्यंत नोकरी सोडावी अन्यथा तुमची हकालपट्टी करु अशी नोटीस बजावली. शिक्षिकेने मात्र नोकरी सोडण्यास नकार दिला. 'मी निर्वस्त्र अवस्थेतील सेल्फी माझ्या जवळच्या मित्रमंडळींसाठी काढली होती. ही सेल्फी चुकून सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकली गेली. यात गैर असे काहीच नसून मी माझ्या अन्य सहका-यांपेक्षा अधिक सन्मानजनक आयुष्य जगत आहे असे या शिक्षिकेचे म्हणणे आहे.