सार्वभौमत्वाचे उल्लंघन टाळून संपर्क वाढवा

By admin | Published: June 10, 2017 12:19 AM2017-06-10T00:19:29+5:302017-06-10T00:19:29+5:30

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन न करता कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी समूहातील देशांनी प्रयत्न

Increase the contact by avoiding the violation of sovereignty | सार्वभौमत्वाचे उल्लंघन टाळून संपर्क वाढवा

सार्वभौमत्वाचे उल्लंघन टाळून संपर्क वाढवा

Next

अस्ताना : दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन न करता कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी समूहातील देशांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) वार्षिक संमेलनात ते बोलत होते.
भारत आणि पाकिस्तानला आता एससीओचे सदस्यत्व मिळाले आहे. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एससीओ समूहात भारताचा झालेला प्रवेश दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी गती देईल. दहशतवादाला तोंड देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. कट्टरवाद, अतिरेक्यांची भरती आणि प्रशिक्षण व आर्थिक मदत या धोक्यांपासून वाचण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत मोदी यांनी सांगितले की, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे.
मोदी-शी चिनफिंग यांच्यात चर्चा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्यात शुक्रवारी येथे चर्चा झाली. एकमेकांच्या समस्यांचा सन्मान करणे आणि वादग्रस्त विषय सामंजस्याने हाताळण्यावर या दोन नेत्यांनी भर दिला. ‘बेल्ट अँड रोड फोरम’वर भारताने बहिष्कार टाकल्यानंतर या दोन नेत्यातील ही पहिलीच भेट होती. या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, चीनच्या सहकार्याशिवाय एससीओचे सदस्य होणे भारताला शक्य नव्हते.
जैश -ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला अतिरेकी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातलेला आहे. याशिवाय एनएसजीच्या सदस्यत्वासाठीही चीनने अडथळे निर्माण केलेले आहेत. त्यामुळे उभय देशातील संबंधात काही प्रमाणात कटुता आलेली आहे. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.

Web Title: Increase the contact by avoiding the violation of sovereignty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.