एच-१बी व्हिसाच्या शुल्कात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:43 AM2023-01-06T09:43:00+5:302023-01-06T09:43:24+5:30
सध्या ४७० डॉलर असलेले एच-१बी व्हिसाचे शुल्क १,५९५ डॉलर होणार आहे.
वॉशिंग्टन : एच-१बी व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने मांडला आहे.
सध्या ४७० डॉलर असलेले एच-१बी व्हिसाचे शुल्क १,५९५ डॉलर होणार आहे. याशिवाय एल-१ व्हिसाचे शुल्क ४६० डॉलरवरून १,९८५ डॉलर, आणि ईबी-५ व्हिसाचे शुल्क ३,६७५ डॉलरवरून ११,१६० डॉलर करण्यात येणार आहे. बायडेन प्रशासनाच्या निर्णयाचा भारतावर माेठा परिणाम हाेणार आहे. नवा नियम ६० दिवसांनी लागू हाेऊ शकताे. (वृत्तसंस्था)