भारत व अफगाणिस्तानमधील संबंध वृद्धिंगत - मोदी

By admin | Published: April 28, 2015 06:50 PM2015-04-28T18:50:40+5:302015-04-28T18:50:40+5:30

तीन दिवसाच्या भारतभेटीवर आलेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आज पंतप्रधान मोदींनी चर्चा केली.

Increasing ties between India and Afghanistan - Modi | भारत व अफगाणिस्तानमधील संबंध वृद्धिंगत - मोदी

भारत व अफगाणिस्तानमधील संबंध वृद्धिंगत - मोदी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - तीन दिवसाच्या भारतभेटीवर आलेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आज पंतप्रधान मोदींनी चर्चा केली.
यावेळी दोन्ही देशांतील अनेक संवेदनशील विषयांवर चर्चा झाली. राजकीय व भौगोलिकदृष्ट्या अनेक मर्यादा असूनही आज भारत व अफगाणिस्तानमधील संबंध वृद्धिंगत होत असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचप्रमाणे, अफगाणिस्तानात शांततानांदावी असे भारताचे मत असून याकरता अफगाणिस्तानेच पुढाकार घ्यावा. तसेच तेथील महिलांसह समाजातील इतर घटकांचे हित लक्षात घेत घटनात्मकरित्या व हिंसाचाराला बगल देत शांतता प्रस्थापित व्हावी असेही मत मोदींनी व्यक्त केले. लोकशाही मार्गाने अफगाणिस्तानची निर्मिती करण्यास भारताता पूर्ण पाठिंबा असेल असे सांगत दहशतवाद संपवण्यासाठी व शांतता नांदण्यासाठी शेजारी देशांकडून सहकार्याची आवश्यकता असल्याचे मोदींनी सांगत पाकिस्तानचा उल्लेख टाळला. 
 

Web Title: Increasing ties between India and Afghanistan - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.