भारत आणि चीन अमेरिकेतल्या नोक-या पळवतात - डोनाल्ड ट्रम्प

By admin | Published: February 22, 2016 05:48 PM2016-02-22T17:48:53+5:302016-02-22T17:48:53+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांवर अमेरिकेतल्या नोक-या पळवत असल्याचा आरोप केला आहे

India and China flee to North America - Donald Trump | भारत आणि चीन अमेरिकेतल्या नोक-या पळवतात - डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि चीन अमेरिकेतल्या नोक-या पळवतात - डोनाल्ड ट्रम्प

Next
>ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन, दि. 22 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांवर अमेरिकेतल्या नोक-या पळवत असल्याचा आरोप केला आहे. भारत आणि चीन अमेरिकेतील नोक-या पळवून नेत आहेत त्या परत आणेन असं आश्वासन ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना दिले आहे. 
डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी अफ्रिकन-अमेरिकांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. 'तुम्ही अफ्रिकन-अमेरिकन नेत्यांना आमच्या लोकांना ट्रम्प खुप आवडत असल्याचं म्हणताना ऐकल असेल, कारण मी चीन, मेक्सिको, जापान, व्हिएतनान आणि भारत या सर्वांकडून नोक-या परत आणणार आहे', असं ट्रम्प म्हणाले आहेत. 
मला अफ्रिकन - अमेरिकन लोकांसाठी खुप काही करायचे आहे. 58 टक्के अफ्रिकन - अमेरिकन तरुण बेरोजगार आहेत. त्यांची परिस्थिती खुप वाईट असल्याचं ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान सांगितल आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही मुख्यत: आपल्यात आणि हिलरी क्लिंटन यांच्यात होणार असून या निवडणुकीत अमेरिकेच्या इतिहासाला एक वळण मिळेल असं भाकीतदेखील ट्रम्प यांनी वर्तवले आहे. 
 

Web Title: India and China flee to North America - Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.