भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 02:54 AM2016-06-22T02:54:27+5:302016-06-22T02:54:27+5:30

आण्विक इंधन पुरवठादार गटात अर्थात एनएसजीमध्ये प्रवेशासाठी भारताला जी सवलत देण्यात येईल तीच पाकिस्तानलाही दिली जावी, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे.

India and Pakistan should be given admission in NSG - China | भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन

भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन

Next

बीजिंग : आण्विक इंधन पुरवठादार गटात अर्थात एनएसजीमध्ये प्रवेशासाठी भारताला जी सवलत देण्यात येईल तीच पाकिस्तानलाही दिली जावी, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे.
अण्वस्त्र प्रसारबंदी करार आणि एनएसजी भारताला सवलत देत असतील, तर ही सवलत पाकलाही मिळायला हवी, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.
चीनच्या सरकारी माध्यमाने पाकला एनएसजीत प्रवेश देण्याला उघड पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ असावी. ‘भारताच्या एनएसजी प्रवेशात चीनचा अडथळा नाही,’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या लेखात म्हटले आहे की, भारताला प्रवेश देऊन पाकला बाहेर ठेवण्यास चीनसह इतर देशांचा विरोध आहे. कारण आम्हाला भारताच्या समस्येचे निराकारण करण्याच्या बदल्यात दुसरी मोठी समस्या निर्माण करायची नाही.
भारत व पाकने १९९८ मध्ये अणुचाचणी केली होती आणि आंतरराष्ट्रीय मंचावरून याचा अमेरिका, युरोपियन संघ आणि जपानने दोन्ही देशांवर कडक निर्बंध घातले होते. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर हे निर्बंध हटविण्यात आले. अमेरिकेने आता भारतासोबत नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली असून, तो भारताच्या एनएसजी प्रवेशाला पाठिंबा देत आहे. मात्र भारताच्या आण्विक दर्जाच्या
वैधतेचा मुद्दा अद्याप सोडविण्यात आलेला नाही, असेही या लेखात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

वॉशिंग्टन : अमेरिकेने एनएसजी सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या मोहिमेला पाठबळ देत या गटाच्या सदस्य देशांना भारताच्या प्रवेशाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे
व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले की, भारत एनएसजीच्या सदस्यत्वासाठी तयार असून, एनएसजी सदस्यांनी सेऊल येथे सध्या सुरू असलेल्या बैठकीत त्याच्या प्रवेशाचे समर्थन करावे, असे आम्हाला वाटते.

Web Title: India and Pakistan should be given admission in NSG - China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.