भारत गर्विष्ठ, नकारात्मक; शांती प्रस्तावावर प्रतिक्रिया न दिल्याने इम्रान खानचा तोल सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:40 PM2018-09-22T16:40:02+5:302018-09-22T17:41:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नाव न घेता आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त करताच भारतीयांनी त्यांना खरीखोटी सुनावली आहे.
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांतीसाठी चर्चेचा प्रस्ताव देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भलतेच संतापले आहेत. त्यांनी भारताला गर्विष्ठ, नकारात्मकतेने भरलेला देश म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही नाव न घेता आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यांनी आपला संताप ट्विटरवर व्यक्त करताच भारतीयांनी त्यांना खरीखोटी सुनावली आहे.
इम्रान खानने म्हटले आहे की, दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण भारताला पत्र लिहिले होते. भारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो आहे. मी आपल्या आयुष्यात अशा छोट्या लोकांना भेटलोय जे कार्यालयांमध्ये मोठ्या पदांवर बसले आहेत. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे.
Disappointed at the arrogant & negative response by India to my call for resumption of the peace dialogue. However, all my life I have come across small men occupying big offices who do not have the vision to see the larger picture.
— Imran Khan (@ImranKhanPTI) September 22, 2018
इम्रान खानने पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्र लिहिले होते. यामध्ये शांतता चर्चा आणि संयुक्त राष्ट्राच्या बैठकीच्या आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाली नाही. या काळात सीमेपलीकडून झालेले दहशतवादी हल्ले, घुसखोरी आणि भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबनेवरून भारताने पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला आहे.