मोदी सरकारचा एक निर्णय अन् अमेरिकेतील दुकानांमध्ये तोबा गर्दी; नेमकं काय कारण..?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 01:36 PM2023-07-24T13:36:09+5:302023-07-24T13:37:40+5:30
केंद्र सरकारने भारतातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला, याचे पडसाद अमेरिकेत उमटत आहेत.
Rice Export Ban:केंद्र सरकारने मागील आठवड्यात देशातील सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. आता या निर्णयाचे पडसाद अमेरिकेत दिसू लागले आहेत. तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयामुळे अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
அமெரிக்காவாம்.. மோடிக்கு ஜே போட்ட கையோட அரிசிக்கு அடிச்சிக்க்கிட்டு சாகுறானுக சங்கிக.😬
— பரம்பொருள் (@paramporul) July 22, 2023
Sanghis are the real ‘Rice Bag’ கூட்டம்.. 🤣🤣 pic.twitter.com/wr34ieYLGi
तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगातील अनेक देशांमध्ये तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लोक तांदूळ खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटबाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. तांदूळ खरेदीसाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. भारत हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. देशातील किमती कमी करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होते
भारत अनेक देशांना गैर बासमती तांदूळ निर्यात करतो. या निर्णयाचा परिणाम अमेरिकेसह इतर देशांमध्येही दिसून येत आहे. अमेरिकेशिवाय नेपाळ, फिलिपिन्स आणि कॅमेरून या देशांचाही यामध्ये समावेश आहे. एका अहवालानुसार, तांदूळ हे जगातील निम्म्या लोकसंख्येचे मुख्य अन्न मानले जाते. आता निर्यात न झाल्यास या देशांमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मागणी-पुरवठ्याच्या खेळामुळे त्यांच्या किमतीही वाढणार आहेत.
अमेरिकेत गर्दी होतीये
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय राहतात. गेल्या आठवड्यात भारत सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा अमेरिकेतील काही ठिकाणी बिगर बासमती तांदळाचा पुरवठा कमी होऊ लागला. त्यामुळे लोक अधिकाधिक तांदूळ खरेदी करण्यासाठी अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये गर्दी करत आहेत. तांदळाचे भाव आणखी वाढणार, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच सुपरमार्केटमध्ये तांदुळ खरेदीसाठी गर्दी होत आहे.
ஒரு மூட்டை அரிசிக்கு மேல நீ வாங்குற ஒவ்வொரு மூட்டையும் இன்னொருத்தர் உணவு. pic.twitter.com/VgGTrbPTOR
— Chef ITPaiyan (@NalaiyaVivasayi) July 22, 2023
हा निर्णय का घेण्यात आला
भारतात टोमॅटो, आले या इतर काही भाज्यांचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. टोमॅटो आणि भाजीपालापाठोपाठ तांदळाचे भावही सातत्याने वाढू लागले आहेत. विशेषत: बिगर बासमती तांदळाच्या दरात 10 ते 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भाव आणखी वाढू नयेत म्हणून सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.