सराव सामन्यात भारताचा पश्चिम ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय
By admin | Published: January 8, 2016 05:09 PM2016-01-08T17:09:30+5:302016-01-08T19:24:05+5:30
ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला.
Next
ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ८ - ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७४ धावांनी विजय मिळवला.
भारताच्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पश्चिम ऑस्ट्रेलियाला निर्धारित वीस षटकात सहाबाद ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर टीआर बर्टचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज अपयशी ठरले.
भारताकडून बीबी सरन, अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताने वीस षटकात चार बाद १९२ धावा केल्या होत्या.
सलामीवीर शिखर धवन (७४) आणि विराट कोहलीच्या (७४) फलंदाजीच्या जोरावर भारताला ही मजल मारता आली. दोघांनी दुस-या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून डफफील्ड, निकोलास आणि केली यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.